चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-हंडरगुळी येथील मंदीर कमिटी व शिवभक्त हे दर सोमवारी नित्यनेमाने एकञ येत आणि सायं.७ वा.महादेव मंदिरात महाआरती व प्रसादाचे आयोजन करत असतात.हा उपक्रम वर्षानुवर्षा पासून नित्यनेमाने हजारो शिवशंभो भक्तांच्या उपस्थितीत व हर , हर महादेव च्या गजरात साजरा होतोय. वनवास भोगत असताना येथील तिरु नदीपाञात स्नान केल्यानंतर श्री राम यांनी रेतीच्या साह्यांनी ही पींड तयार केली.व या पींडीचे दर्शन घेतले.अशी अख्याईका आहे.
हंडरगुळी येथील महादेव मंदीर देख- रेख समिती व भाविक नेहमी एकञ येतात.तसेच दर सोमवारी एकञीत येऊन मंदीर परिसर धुवून-पुसून स्वच्छ करतात.आणि सायंकाळी ७ वा.नित्यनेमान महाआरती व प्रसादा चे आयोजन करतात.व ही प्रथा गत कित्येक वर्षापासून सुरु आहे.व हा उपक्रम तथा सेवा शिवभक्त स्वयं स्फुर्तपणे व स्वखर्चाने करतात.हे विशेष.
या मंदीरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम असतात.तसेच १५आगस्ट व २६ जानेवारी दिवशी जर सोमवार असेल तर मंदीरातील पिंडीला तिरंगा ध्वजासारखी सजावट करतात.तसेच मोसमानुसार फळाफुलांनी ही पिंड सजवितात.
गत कित्येक वर्षापासून हा उपक्रम अखंडितपणे सुरु आहे.तसेच हजारो शिवभक्तांची व मंदीर समितीची शिस्त,एकता व निस्वार्थ सेवाभाव कौतूकास्पद आहे.नवसाला पावणारे हे शिवमंदीर असल्याने शंभो महादेव भक्त नवस बोलण्यासाठी व नवस फेडण्यासाठी म्हणुन येतात.सुकणी, मोरतळवाडी,चिमाचीवाडी,रुद्रवाडी, आनंदवाडी,खरबवाडी,वंजरवाडी, आडोळवाडी,चिद्रेवाडी,वडगाव, हाळी सह परिसरातील गावातील हजारो महिला-पुरुष शिवभक्त हंडरगुळीच्या महादेव मंदीरात दर सोमवारी ७ वा. महाआरती तसेच प्रसादाचा लाभ मोठ्या भक्तिभावाने घेत असतात.तसेच बोलल्या प्रमाणे मंदीरात दर सोमवारी भाविकांद्वारे अभिषेक केला जातो.अशी माहिती मंदीराचे पुजारी विश्वनाथप्पा स्वामी- मठपती यांनी दिव्यमराठी ला दिली.
0 टिप्पण्या