जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ६ शोध आणि बचाव पथक केले तैनात !
✍️ भवन लिल्हारे उपसंपादक महाराष्ट्र राज्य मो.नं. 9373472847
भंडारा :- वैनगंगा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे भंडारा शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. भंडारा शहरातील वैशाली नगर गणेशपुर भोजापुर आणि टाकळी या परिसरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.
भंडारा ते मोहाडी या मार्गावरील मराठी रोडवरील पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून पुलावर पाणी येण्यास फक्त एक फूट बाकी आहे. पाण्याची पातळी वाढल्यास हा मार्ग केव्हाही बंद पडू शकतो अशी अवस्था आहे.
६ शोध बचाव पथक कार्यरत
जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहा शोध आणि बचाव पथक तैनात केले असून ते कार्यरत झाले आहे. भोजापूर टाकळी तसेच वैशाली नगर या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
स्थलांतरित पूरग्रस्त कुटुंबीयांना भोजन
कारधा येथील स्थलांतरित पूरग्रस्त कुटुंबीयांसाठी प्रशासनाने तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली असून त्यांना भोजन देण्याची व्यवस्थाही केली आहे.
0 टिप्पण्या