चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : नंदुरबार जिल्ह्य़ातील सर्वच शाळांचा परिसर तंबाखूमुक्त व दारूमुक्त करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,ईकबाल शेख ,दिलीप महिरे,संजय भील, सुभाष भील,रंजीत भील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्य़ातील लोकांना व्यसनांचे प्रमाण जास्त वाढले आहे.जिल्ह्य़ात काही शाळा जवळच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ,विमल गुटखा,दारू सर्रास पणे विक्री सुरू आहे.शाळा कंपाऊंडला लागून काही ठिकाणी बियर बार सुरू आहेत. त्याचा शाळकरी मुलांवर परिणाम होऊन मुलांवर वाईट परिणाम होत आहे.तसेच शाळकरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तंबाखूमुक्त व दारूमुक्त शाळा करणेसाठी प्रशासनाच्या सक्त सूचना असल्या तरी काही ठिकाणी कागदोपत्रीच दिसून येते,प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
भावी पिढीला व्यसनांपासून मुक्त शाळा परिसरात नुसते तंबाखूमुक्त शाळा असे फलक लावून उपयोग नाही तर त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांची विक्री वाहतूक करणा-या वाहनांची व विक्री करणा-या दुकानांची सखोल तपासणी करणे गरजेचे आहे.व्यसनांचे दुष्परिणामबाबत जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे.तरी नंदुरबार जिल्ह्य़ातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व दारू विक्रीस बंदी घालून सर्वच शाळा परिसर तंबाखूमुक्त व दारूमुक्त करण्यासाठी कडक कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या