चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-दिनांक 21 जुलै 2025 रोजी मोर्शी शहरातील कायमस्वरूपी तसेच हंगामी तयार झालेल्या डास उत्पत्तीस्थानामध्ये गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार सर जिल्हा हिवताप अधिकारी माननीय डॉक्टर शरद जोगी सर हत्तीरोग अधिकारी डॉक्टर जुनेद सर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
मोर्शी शहरातील विश्रामगृह परिसरातील डास उत्पत्तीस्थानामध्ये माननीय आमदार चंदू भाऊ यावलकर (विधानसभा मोर्शी) यांचे हस्ते गप्पी मासे सोडून मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील हंगामी तसेच कायमस्वरूपी डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येऊन नागरिकांना कीटकजन्य आजाराबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले गप्पी मासे लारवा कसे खातात व गप्पी माशाची उपयुक्तता डासाची पैदास कशी रोखतात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
हिवताप डेंगू ,चिकनगुनिया, हत्तीरोग या आजाराचे डास घरातील भांडी टाकी, राजन, माठ ,जुना टायर ,फुटके डब्बे, फुटलेल्या बादल्या, फुलदाण्या यामध्ये साचलेल्या पाण्यात नालीत हे डास अंडी देतात व डास तयार होऊन आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी नागरिकांनी आपल्या घरी व परिसरात स्वच्छता ठेवून उपायोजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळणे म्हणजेच घरगुती पाणी साठवण्याची भांडी हौद, माठ, व राजन इत्यादी घासून पुसून स्वच्छ कोरडे करावेत व पूर्ण सुकल्यानंतर पाणी भरावे, पाणी जाड कापडाने गाळून घ्यावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडावा घराच्या छतावर किंवा आवारात पडून असलेली निकामी वस्तू जसे टायर, शीशा, टिंड डब्बे यांना नष्ट करावे आणि त्याची विल्हेवाट लावावी प्रत्येकाने आपापल्या घरासमोरील नाल्या स्वच्छ ठेवाव्या पाणी वाहते ठेवावे घराच्या परिसरातील डबके किंवा गटारे तयार होऊ देऊ नये झाल्यास घरगुती उपाय म्हणून पाणी साठलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडावे संडासच्या गॅस पाईपला पातळ कापड किंवा नायलॉनची पिशवी बांधावी डासापासून संरक्षणाकरिता मच्छरदाणीचा वापर करावा शक्य असल्यास दरवाजे व खिडक्यांना जाळ्या लावून डासापासून बचाव करावा डासापासून बचावासाठी संध्याकाळच्या वेळेस पूर्ण बाजूचे कपडे वापर करून परिधान करावे नागरिकांनी उपरोक्त उपाययोजनाची अंमलबजावणी केल्यास त्यापासून होणाऱ्या कीटकजन्य रोगापासून मुक्ती सहज शक्य आहे.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे कर्मचारी विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, नंदू थोरात, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत ,ज्योती मालवीय, निलेश चौधरी, बाबाराव जाधव, उमेश जंजाळकर, श्रीकांत मांडवे ,राजेश गजबे, राहुल चौधरी, सुशील धोटे, नितीन चिखले, अजय साबू व इतर सर्व हजर होते
0 टिप्पण्या