Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबार मध्ये बोगस डेंटल लॅबचा भांडाफोड, रूग्णांच्या जीवाशी खेळ!

बोगस डेंटल लॅब बंद करण्याची बिरसा फायटर्सची मागणी ; जिल्हाधिकारी व जिल्हाशल्यचिकित्सक यांना निवेदन!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्य़ात कृष्णा डेंटल लॅब नंदुरबार, केवलेंद्र प्रसाद डेंटल लॅब नंदुरबार, स्टार डेंटल लॅब शहादा इत्यादी ठिकाणी  अवैद्यरित्या व बेकायदेशीर सुरू असणारे बोगस  डेंटल लॅब तात्काळ बंद करून लॅब चालवणा-यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कडक  कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व जिल्हाशल्यचिकित्सक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,सुरेश पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   दंतवैद्य कायदा,१९४८ च्या कलम २ (१) अंतर्गत,मुंबई दंतवैद्य नियम १९५१ आणि सुधारित दंतवैद्य (नितीशास्त्र) नियम २०१४ नुसार नोंदणीकृत नसलेल्या दंतवैद्य आणि दंतवैद्यांवर कारवाई करण्याचा सार्वजनिक सुचना एका परिपत्रकाद्वारे कुलसचिव महाराष्ट्र राज्य दंत परिषद मुंबई यांनी दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी केलेल्या आहेत.तसेच महाराष्ट्र शासन वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक-०११९ दिनांक २२ जानेवारी २०१९ नुसार बोगस दंतवैद्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आदेश राज्यातील सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. 
                      नंदूरबार जिल्ह्य़ात कृष्णा डेंटल लॅब नंदुरबार, केवलेंद्र प्रसाद डेंटल लॅब नंदुरबार, स्टार डेंटल लॅब शहादा इत्यादी अनेक बोगस डेंटल लॅब सुरू आहेत. हे डेंटल लॅब चालवणारे बिहारी व इतर राज्यातील व्यक्ती असून त्यांना रूग्णांशी मराठी,इंग्लिश व स्थानिक आदिवासी भाषा बोलता येत नाहीत.जिल्ह्य़ातील आदिवासी नागरिकांच्या अज्ञानाचा व भोळीपणाचा गैरफायदा घेऊन हे बोगस डेंटल लॅबवाले फक्त पैसा कमावण्याच्या उद्धैशाने गोरखधंदा करीत आहेत. नागरिकांना बोगस डाॅक्टर कोण व खरा डाॅक्टर कोण हे ओळखणे शक्य नसते.त्यामुळे नाईलाजाने बोगस डाॅक्टर व रूग्णालयात रूग्णांना  उपचार करावा लागतो.जिल्ह्य़ातील बोगस डेंटल लॅब मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,हे बोगस लॅबवाले नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. या डेंटल लॅब मध्ये रूग्णांच्या तोंडाच्या आत मोनोमर लावून दाबतात, त्यामुळे रुग्णांच्या हिरड्याला दुखापत होऊन कॅन्सर होतो. अशा अवैद्य पणे व चूकीच्या पद्धतीने उपचार करणा-या दंत वैद्यांमुळे नंदुरबार जिल्ह्य़ात कॅन्सर रूग्णांचे प्रमाण वाढत आहे व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.हे दंतवैद्य रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. या बोगस डेंटल लॅबचा भांडाफोड करत लॅब चालवणा-यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी व जिल्हाशल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या