साईनाथ सूर्यवंशी यांची मंत्रालयात तर गजानन सुरोसे यांची नागपूर हायकोर्टात निवड
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड
हिमायतनगर - तालुक्यातील सरसम (बु) येथील कै.श्रीधरराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी असलेले साईनाथ सूर्यवंशी व गजानन सुरोशे यांची शासकीय नोकरीमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यालयामध्ये त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. साईनाथ सूर्यवंशी यांची मंत्रालयामध्ये तर गजानन सुरोशे यांची नागपूर हायकोर्टामध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाकडून त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गजानन सुरोशे व साईनाथ सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण केलेला अभ्यास व संघर्ष याची कहाणी सांगत प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले आहे. गरिबी ही शिक्षणामध्ये अडचण ठरू शकत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे दोघं आहेत. गावासाठीच नाही तर आपल्या शाळेतले विद्यार्थी म्हणून आपल्या शाळेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी पुढे चालून यांची प्रेरणा घेऊन अशाप्रकारे यशस्वी व्हावे यासाठीच असे कार्यक्रम आयोजन करण्यात येतात.असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी केले.त्या दोघांचेही पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिक्षक चव्हाण सर, जाधव सर ढेमकेवाड सर,राऊतवार सर, कांबळे सर, मोतेवार मॅडम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या