चित्रा न्युज प्रतिनिधी
तळेगाव दशासर:- स्थानिक गावातील जीर्ण रस्त्यांबाबत, स्थानिक मावळे ग्रुप आणि ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावली आणि ग्रामपंचायत सरपंचांना बेशरमची झाडे भेट दिली आणि निवेदन सादर केले. गावातील सर्व मुख्य रस्ते केवळ खराब स्थितीतच नाहीत तर विशेषतः पावसाळ्यात चालण्यासाठी योग्य नाहीत, तर इतर ऋतूंमध्ये त्यावर चालणे देखील योग्य नाही या गावातील मुख्य रस्त्यांवर, बस स्टँडपासून शहीद दीपक ठाकरे चौक, मेडिकल चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुढे आठवडा बाजारापर्यंत, डझनभर नव्हे तर शेकडो खड्डे आहेत ज्यामुळे या रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांना मोठी अडचण होणार आहे. आम्ही मावळे ग्रुप आणि ग्रामस्थांनी बस स्टँडपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या सर्व मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून गाव प्रशासनाचा निषेध केला आणि आमदार आणि खासदार गावामध्ये प्रवेश बंद करू असे आंदोलन कर्त्यानी केला आणि प्राधान्याने रेतीने भरून लोकांसाठी आरामदायी मार्ग बनवण्याची विनंती सरपंचांना सादर केली. यावेळी आम्ही मावळे ग्रुपचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच मिनाक्षी ठाकरे------
सरपंच मीनाक्षी ठाकरे म्हणाल्या की, गावातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी आणि गावात खडी भरण्यासाठी लेखी परवानगीसाठी दोन दिवसांपूर्वी तहसीलदार धामणगाव यांना अर्ज देण्यात आला होता आणि परवानगी मिळाल्यानंतर रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरूम भरल्या जाईल.
0 टिप्पण्या