Ticker

6/recent/ticker-posts

वीज कर्मचा-याच्या बदलीकडे वरिष्ठ का करतात टंगळ-मंगळ ?





हाळी येथील ग्राहकांचा सवाल ..
 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-वीज वितरण कंपनीचे हाळी येथे ३३ केव्ही.वीज उपकेंद्र असून या वीज केंद्रात कार्यरत असलेला लाईनमन नामे महंमद तांबोळी हा गावातील वीज ग्राहकांशी सौजन्याने वागत नाही.तसेच त्याच्या हद्दीतील लाईट फाॅल्ट काढण्यासाठी सांगुनही येत नाही.या सारख्या असंख्य तक्रारींची यादी वाढतच चालली असून महंमद तांबोळी नामक वीज कर्मचा-याची बदली करण्यात यावी.अशी मागणी एप्रील व जुलै महिण्यात हाळीतील ४५ जणांसह ठाकरे सेनेच्या तालुका प्रमुख पी.एस.मोरे तसेच युवासेना जिल्हा सरचिटणीस रमन माने यांनी उदगीरच्या कार्यकारी अभियंत्याकडे लेखी स्वरुपात करुनही अद्यापही बदली झाली नसल्याने शेतकरीबंधू सह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
या बाबत विचारणा करण्यासाठी फोन केला असता कार्यकारी वीज अभियंता यांनी फोन घेतला नाही.व हा प्रकार म्हणजे हाळी च्या कामचुकार तसेच ग्राहकांशी अरेरावी करणा-या लाईनमनला शुभार्शिवाद देण्याचा व बदली बाबत टंगळमंगळ करण्याचा प्रकार असून,वरिष्ठ टंगळमंगळ का करतात. अशी प्रतिक्रिया तक्रारकर्त्ते शेतकरी तथा युवा सेना जिल्हासरचिटणीस रमन माने यांनी दिली.
*सध्या पाऊस पडत असल्याने एकदा गेलेली वीज बराचवेळ येत नाही.ही माहिती देण्यासाठी फोन केला तरी हा लाईनमन फोन घेईना.घेतला तर उलटसुलट उत्तरे देतो.म्हणुन महमद तांबोळी नामे लाईनमनची तत्काळ बदली करावी.अन्यथा जनाक्रोष वाढू शकतो.असे मत गिरिधर शाहीर यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या