प्रताप क्रीडा मंडळाच्या 'रत्नाई चषक' राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न…
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त स. म. शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन महर्षी हॉल, शंकरनगर- अकलूज येथे प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज च्या वतीने आयोजित केलेल्या 'रत्नाई चषक' राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण मा.कु. कृष्णप्रिया संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपाध्यक्ष पोपट भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे, प्रवीण ढवळे, मल्हारी घुले व मंडळाचे सर्व संचालक, सदस्य उपस्थित होते.
मंडळाचे संस्थापक मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवित आहेत. १९९४ पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यातून ५४० खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्विझलिंग पद्धतीने खेळविण्यात आलेली ही स्पर्धा १२ वर्षे, १७ वर्षे वयोगट व खुला गट अशा तीन गटांसाठी आयोजित करण्यात आली. या तिन्ही गटात माळशिरस तालुक्याच्या खेळाडूंसाठी स्वतंत्र बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेत ६० रोख बक्षिसे, ६० चषके, ६० पदके तसेच प्रत्येक गटात २० पेक्षा अधिक आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
मागील वर्षी ११२५ पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेऊन देशातील सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करण्याची कामगिरी मंडळाने केली.
*स्पर्धेतील गटनिहाय प्रथम पाच क्रमांक पुढीलप्रमाणे-*
(१२ वर्ष तालुकाबाह्य गट)
वेदांत पेडणेकर, श्वेतांजली जाधव, हर्ष जाधव, आदित्य सोनी, सत्यजित वेठेकर
(१२ वर्ष माळशिरस तालुका गट)
सार्थक राऊत, निधीशा देशमाने, ओम राऊत, विनय रणसुबे, अथर्व पताळे
(१७ वर्ष तालुकाबाह्य)
आर्यन परदेशी, सानवी गोरे, नागेश राजमाने, अर्जुन अडगळे, रेहान आतार
(१७ वर्ष माळशिरस तालुका)
श्रीराम राऊत, रक्षिता जाधव, पार्थ पाटील, आदर्श कांबळे, आदित्य चव्हाण
(खुला तालुकाबाह्य गट)
पार्थ वाळेकर, दिपक क्षीरसागर, महेश पवार, नितीन राठोड, श्रीनिवास परदेशी
(खुला माळशिरस तालुका गट)
शशिकांत बनसोडे, सौरभ जगताप, अनिरुद्ध गुरव, प्रदीप पांढरे, प्रतिक इंगळे
स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिलेले उदय वगरे, रमेश जाधव, गणेश मस्कले, विद्याधर जगदाळे, दत्तात्रय गोरे, कर्णाक्षी जाधव, महादेव आठवले, राहुल बोराटे, अली शेख, प्रभावती लंगोटे, अनिता बावळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. निकालाचे वाचन किरण सूर्यवंशी, राजकुमार पाटील, इलाही बागवान यांनी केले. स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.
0 टिप्पण्या