नांदेड-बिदर रोडला 'यमदुत' रोड होण्यापासून वाचविणार कोण ?
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-हंडरगुळी येथून नांदेड-बिदर जाणा-या रोडवर तसेच मेन मार्केट मध्ये आणि अनेक गल्ल्यांमध्ये लहान,मोठ्या वाहनांच्या चालकांचा विशेष करुन अल्पवयीन चालकांचा बेशिस्तपणा दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे सामान्य जनतेला दिसते.पण याची तक्रार करावी कुठे! कारण,यावर कारवाई करणारी ठोस अशी यंञणाच येथे नाही.म्हणुन येथे कारवाईचा अभाव आणि ना-बालक असलेल्या चालकांचा बेशिस्तपणा अनेक निष्पाप लोकांचा हकनाक बळी घेऊ शकतो.म्हणुन येथील सर्व सामान्य जनता चिंताग्रस्त दिसतात. येथील नांदेड-बिदर रोडवर तसेच २ बाजार पेठेत 'पीक अवर्स' म्हणजे मरणाला आमंञण देणारे चिञ रोज अनेकदा पहावयास मिळते.आणि याचे प्रमुख कारण म्हणजे वाहनांसह वाहनचालविण्याचा कसलाही कागद (परवाना) नसतानाही अनेक वाहन चालक मंडळी विशेषत: अल्पवयीन असलेले चालक त्यांच्या ताब्यातील गाडी ही 'यमा' कडे असलेल्या 'गरुड' वाहना पक्षापेक्षाही अति भयानक वेगात चालविताना तसेच कुठेही बेशिस्तीत पार्क करताना दिसतात.
विशेष म्हणजे नांदेड-बिदर रोडलगत शाळा,ज्यु.काॅलेज,बॅंका,२ग्रा.पं.सह शासकिय,निमशासकिय कार्यालये व २ बाजार पेठा आहेत.म्हणुन दररोज परिसरातील हजारो नागरीक तसेच लहान,मोठ्या वाहनांची गर्दी याच रोडवर असते.आणि याच रोडवरुन रोज शेकडो वाहने वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवित यमदुताच्या गतीपेक्षाही जास्त गतीने धावताना बघून अशा कांही वाहनांमध्ये अवैध (गुटखा,चंदन,सागवान,दारुगांजा इ) मालाची तस्करी तर होत नाही,ना ! अशी शंका सुज्ञांना येते.
हाळी-हंडरगुळीतील म्हत्वाचे सगळे कार्यालयासह शैक्षणिक संस्था चालू व बंद व्हायच्या वेळेतच कांही लहान मुले ट्रीपल,चोबल सीट्स वायुवेगाने, वेडीवाकडी स्टाईल मारत टु व्हिलर गाडी चालविताना बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.येथील मेन रोडवर व मार्केट मध्ये 'पीक अवर्स' म्हणजे मरणाला आमंञण देणारे क्षण रोज अनेकदा नजरेस पडतात. तरी सुध्दा आपल्या अल्पवयीन लेकराला गाडी देताना त्या बाप मंडळींना स्वत:च्या काळजाचा तुकडा 'प्रिय' नाही का?असा सवाल सुज्ञ नागरिकांतून विचारला जातोय. तसेच हा प्रकार फक्त वाहतुकीपुरता मर्यादीत नव्हे तर अल्पवयीन चालक व सामान्य नागरिक,विद्यार्थी,वयस्क मंडळी यांच्यासह गुराढोरांच्याही सुरक्षेशी संबंधित आहे.तेंव्हा संबंधित यंञणेंनी याची तात्काळ गांर्भियाने दखल घ्यावी.आणि नांदेड-बिदर या रोडला 'यमदुत रोड' होण्यापुर्वीच कारवाईचे अस्ञ बाहेर काढावे, अन्यथा चालकांच्या रुपात फिरणारे *यमदुत* अनेकांचे हकनाक जीव घेतील.आणि मग ते मोजायची वेळ संबंधित यंञणेवर येईल !!


0 टिप्पण्या