चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-"गुरूचे ज्ञान सागरा प्रमाणे अथांग आहे.गुरू बुद्धीचा मळ घालवितात.विवेक रुपी तिर्थाचे स्नान गुरूंच्या आशीर्वादाने घडते व साधक शुद्ध सात्विक ज्ञानाने सुस्नान होतो" असे प्रतिपादन प्रा.सुमंत देशपांडे यांनी केले.ते शीतला माता मंदिर सभागृह येथे पतंजली योग समिती (संभाजीराजे उद्यान, मिस्किन गार्डन ) च्या वतीने आयोजित गुरू पूर्णिमा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बोलत होते.प्रा.देशपांडे हे नुकतेच पंढरपुर हून पायी वारी करून आले आहेत.मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वरलालजी काबरा,प्रमुख पाहुणे प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे,प्रभाकर तडस,महादेव बांगडकर, चिंधूजी बुध्दे ई मान्यवर उपस्थित होते.सोबतच अतुल वर्मा,इंदिरदेवी काबरा,घनश्याम धूर्वे,उद्धव डोरले,सतराम कौरानी,दुर्गाताई डोरले, शेख, डॉ बाळकृष्ण सार्वे,सदानंद इलमे,वामन गोंधुळे, अनिल शेंडे,ललित बीसेन,बबन इश्र्वरकर, ई मान्यवर व मोठ्या संख्येने योगसाधक,साधिका उपस्थित होत्या.दुपारी प्रथम हवन_,पूजा करण्यात आली.
दीप प्रज्वलन करून, मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.प्रास्ताविक प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे यांनी करून गुरू पूर्णिमा बाबत योग्य मार्गदर्शन केले.अध्यक्ष ईश्वर लाल काबरा,प्रभाकर तडस,महादेव बांगडकर ई पाहुण्यांनी ही मार्गदर्शन केले.सूत्र संचालन अतुल वर्मा यांनी तर आभारप्रदर्शन पुरुषोत्तम वैद्य यांनी केले.रुचकर भोजन पश्चात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे यशस्वीेतेसाठी अतुल वर्मा,पुरुषोत्तम साकुरे, आत्माराम बेदरकर,संजय मोहतुरे,पुरुषोत्तम वैद्य, प्रभू मडावी, शीतला माता मंदिर समिती ट्रस्ट, बांगडकर केटरर्स तथा सर्व योगसाधकांनी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या