हंडरगुळीत स्वच्छ भारत मिशनचे वाजले बारा !!
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-'एसबीएम' म्हणजे स्वच्छ भारत मिशन या नावाने शासनाने चालू केलेल्या अभियानाचे हंडरगुळी {ता.उदगीर} परिसरात १२ वाजले आहेत.असे म्हणणे चुकीचे नाही.
कारण,घरी शौचालय असूनही तसेच शौचालयाचे १२ हजारचे अनुदान घेऊनही भागातील ग्राम पंचायतचे व पं.स. तसेच जि.प.चे कांही आजी व माजी सदस्य हवा खात उघड्यावर शौचास बसत असल्याने या भागात स्वच्छ भारत मिशनचा पुरता फज्जा उडाला असल्याचे दिसते.
शासनाने जनतेचे विशेषत: महिला- भगीनींचे आरोग्य निरोगी असावे, याकरिता शौचालयासाठी १२ हजार रु.चे अनुदान ही दिले.आणि याचा अनेकांनी लाभ घेतला.माञ शौचास घरी बांधलेल्या शौचालयात न बसता उघड्यावर हवा खात बसत असल्या मुळे बसस्थानक व गावाजवळील पाणंद घाणीने बरबटल्याचे दिसते.
बांधलेल्या शौचालयात जळणफाटा व अन्य साहित्य ठेवत असल्यामुळे हगणदारीमुक्त गाव या योजनेचा फज्जा उडाल्याचे चिञ हंडरगुळी, हाळी,सुकणी,मोरतळवाडी,रुद्रवाडी परिसरात दिसते.
गुड माॅर्निंग पथक आलेच नाही.
शासनाने नेमलेले गुड माॅर्निंग पथक जसे नेमले आहे.तसे अद्याप एकदा सुध्दा या परिसरात आले नाही. म्हणुन हे पथक कुठे गायब झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकुणच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छ भारत व हगणदारीमुक्त गाव या चांगल्या योजनेचे बारा वाजले आहे.तेंव्हा खरोखरच हगणदारीमुक्त गाव करायचे असेलतर प्रशासनाने, गुड माॅर्निंग पथकाने जाणुनबुजून दुर्लक्ष न करता या भागातील गावो गावी अचानक पाहणी करावी आणि १२ हजाराचे अनुदान फस्त करुनही उघड्यावर हवाखात बसणा-यांकडून ते १२ हजार व्याजासकट वसूल करण्याचे धाडस दाखवावेत.अशी मागणी १२ ह.अनुदानापासून वंचित असलेल्यांमधून होत आहे.
0 टिप्पण्या