चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे/अमरावती :- गणपती उत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रात मोठ्या व उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा होणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे हा उत्सव भगवान श्री गणेशाच्या जन्मदिनी चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो गणपती उत्सव दहा दिवसांचा असतो ज्यामध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. त्याची मनोभावे पूजा केली जाते हा गणपती उत्सव सार्वजनिक आणि घरगुती स्तरावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या उत्सवा द्वारे सांस्कृतिक आणि सामाजिक एकोपा वाढतो.
गणेशोत्सव महाराष्ट्रात एक मोठा सण असल्याने या दिवसांमध्ये शहरांमध्ये आणि गावांमध्ये उत्साहाचे वातावरण असते सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळी विविध कार्यक्रमा आयोजित करतात सांस्कृतिक, स्पर्धा, सामाजिक उपक्रम यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात.
अशा लाडक्या गणरायाच्या आगमन २७ ऑगस्ट रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे यापुढे गणेशोत्सव हा' राज्याचा महोत्सव' म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी विधिमंडळात केली आहे लाडक्या गणरायाचा उत्सव म्हणजे राज्याच्या गौरव आणि अभिमान असलेला उत्सव आहे त्यामुळे आता हा सण अधिकृतपणे महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून साजरा केला जाईल.
0 टिप्पण्या