Ticker

6/recent/ticker-posts

शाहीर अरुण मेश्राम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण अवॉर्ड 2025 सन्मानित,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :- युनिवर्सल बुक ऑफ रेकॉर्डर्स, समृद्धी प्रकाशन द्वारा आयोजित, राष्ट्रीय विदर्भ कला सामाजिक संमेलन पुरस्कार समारोह नागपूर 2025 दिनांक-03/08/2025 स्थळ- मधुरम सभागृह विदर्भ हिंदी साहित्य संमेलन झासी राणी चौक वर्धा रोड नागपूर, येथे मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे उद्घाटक - डॉक्टर रवींद्र कोल्हे ( फेमस सोशल वर्कर मेळघाट अमरावती ) याच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - मोरेश्वर निस्ताने ( प्रसिद्ध फिल्म संगीत निर्देशक गायक अमृत प्रतिष्ठान नागपूर ) डीआर प्रशांत गायकवाड ( गिनीज विश्व रेकॉर्ड धारक राष्ट्रपती पुरस्कार विजेता ) मोनिका पीटर दातास ( प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या नवी मुंबई ) जगदीश भद्रे ( राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती ) अनंत भारसाकडे नागपूर, राहुल उ के अमरावती, रवींद्र दिघोरे नागपूर, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - डॉक्टर बी एन खरात सर ( समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग ) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील पिंड के पार दंडारीचे सुप्रसिद्ध शाहीर अरुण सोमाजी मेश्राम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला, सर्वश्री शाहीर विष्णू मेंगरे, शाहीर लीलाधर वडांदे, शाहीर रमेश रामटेके, रावजी धारणे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, गायक सदानंद मोरे, ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर, गायक अनिल वैद्य, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - डॉक्टर बी एन खरात सर ( समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग ) यांनी सर्वांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या