चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : सन 2017 मध्ये ओबीसींच्या न्याय हक्का करिता तसेच ओबीसी ची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे ओबीसींना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी असे अन्य उद्देश ठेवून ओबीसी क्रांती मोर्चा ची स्थापना करण्यात आली होती आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या आज आठवा वर्धापन दिन तसेच क्रांती दिन व आदिवासी दिवस साजरा करण्यात आले.भंडारा शहरातील छोटा बाजार येथील वीर भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून मानवंदना देण्यात आली.याच निमित्ताने भंडारा शहरातील जवळील गुंजेपार येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते,संयोजिका महिलाध्यक्ष शोभा बावनकर, तालुकाध्यक्ष मनिषा भंडारकर,तालुकाध्यक्ष सुधीर सार्वे,यशवंत सूर्यवंशी,प्राचार्य राजपूत, संयोजक जीवन भजनकर,गावातील मिलन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य घोडीकर,राजकुमार कावळे,डी के सिंग,ध्यानेश्वर चव्हाण,शेखर बांते,रामचंद्र बुरडे,बावणे सर, मणसाराम बावणे, ग्राम.उपसरपंच लांडगे,सदस्य घरडे,पो.पा.तितीरमारे, गजानन फुलबांधे गजानन फुलबांदे,संजय घरडे,दुर्योधन धांडे,चिंतामण विश्वकर्मा,विशाल विस्मकर्मा,फुलचंद बुरडे,रवी मने,राज विश्वकर्मा,अभिजीत तिरीमारे,मंगेश साळवे,प्रफुल्ल चव्हाण,अंकुश साळवे भुनेश्वर विश्वकर्मा,धनु भेंडारकर ओबीसी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते प्रतिक्रिया ओबीसी क्रांती मोर्चा स्थापन होऊन आज सात वर्षे पूर्ण झाले या सात वर्षांमध्ये प्रेस च्या माध्यमातून प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रिक मीडिया असो युट्युब मीडिया असो यांनी ओबीसी क्रांती मोर्चाच्या प्रत्येक कार्याला वाचा फोडण्यासाठी जे सहकार्य केले त्या सहकार्याने निमित्त स्थापना दिवशी सर्व प्रेस बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले
0 टिप्पण्या