Ticker

6/recent/ticker-posts

..अखेर एकवटले "साकोली सेंदूरवाफा" स्थानिक युवा

सुशिक्षित बेरोजगारांवर अन्यायाविरुद्ध उभारले व्यासपीठ 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -साकोली सेंदूरवाफा शहरात काही बाहेरून आलेल्यांनी अतोनात अतिक्रमणे करून त्याचा व्यवसाय सुरू केला. याचा फटका स्थानिक युवा व बेरोजगार निवासींना येथे जागा मिळत नाही. करीता आता सर्व स्थानिकांनी "साकोली सेंदूरवाफा निवासी संघटना" या ज्वलंत मंचाची अखेर स्थापना करण्यात आली. दररोज या संघटनेत असंख्य रहिवासी जुळत असून हा लढा आता अधिक तीव्र होणार असे संकेत दिले गेले आहेत. 
               पाच दिवसांपूर्वी बसस्थानक समोर एका व्यक्तीने त्याचे अगोदरच दोन दोन अतिक्रमणे असून दूरसंचार विभाग समोर शासकीय जागेवर भव्य चाळ काढून ती भाड्याने किंवा विक्री करण्याच्या उद्देशाने दिवसाढवळ्या अतिक्रमण सुरू होते. पण शहरातील काही जागृत निवासी युवकांनी याचा तीव्र विरोध केला. सोबतच नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना सुद्धा याची माहिती झाली. त्यातच तेथे काही काळ तणावाचे वातावरण होते. या विषयांवर येथील स्थानिक सुशिक्षित युवा बेरोजगार चांगलेच संतापले. आणि मग तीन चार युवकांची बैठक, त्यातून चर्चा नंतर व्हाट्सअप ग्रुप व आता सुमारे शंभराहून अधिक स्थानिक युवकांची एक संघटना निर्माण झाली आहे. आता या संघटनेचा मुख्य उद्देश की, आमच्याच गावात अनं आम्हालाच एक रोजगार करायला जागा नाही. बाहेरील लोक शहरात येऊन प्रचंड प्रमाणात शासकीय जागेवर आपला कब्जा करतात. नंतर पक्के बांधकाम करून ते गाळे किरायाने देतात व कालांतराने त्या शासकीय भूखंडावरील निर्माण दूकाने लाखों रुपयांत विकल्याचा गुन्हेगारीतील हा संतापजनक प्रकार सुरू आहे. मग आम्ही मुळ निवासी जायचे कुठे.? यासाठी आता सर्व साकोली सेंदूरवाफा स्थानिक युवा सुशिक्षित बेरोजगारांनी ही संघटना एका आँनलाईन सोशल मिडीयातून उभारली आहे. दररोज या संघटनेत असंख्य रहिवासी जुळत आहेत व या ज्वलंत प्रश्नांवर लवकरच जिल्हाधिकारी, एसडीओ, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांना अफाट स्थानिक निवासींच्या स्वाक्षऱ्यांसह आपल्या न्याय हक्कासाठी निवेदन देऊन शहरातील रिकाम्या जागेवर आपला कब्जा हक्क कायम करतील असा पवित्रा आता स्थानिक निवासींनी घेतला आहे. 
          या "साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटना" मध्ये शहरातील अनिल कापगते, महेश पोगळे, गणेश बोरकर, आशिष चेडगे, किशोर बावणे, दामराज सुर्यवंशी, स्वप्निल गजभिये, आशुतोष झिंगरे, विशाल साखरवाडे, आशिष बोरकर, अजय गजभिये, सतिश नंदेश्वर, चंदू कापगते, चंद्रकांत वडीचार, ऋग्वेद येवले, अमोल गेडाम, गणेश सुर्यवंशी, वैभव सुर्यवंशी, अमेय डुंभरे, अविनाश रंगारी, चेतन बोरकर, कैलास पंचबुद्धे, मुकेश पंचभाई, मनिष राऊत, मनिष शहारे, मृणाल बडोले, धर्मेंद्र वाडीभस्मे, राजेश मेश्राम, रवि शहारे, रितीक तिडके, शैलेश गोबाडे, विशाल केरझरे, अनिल डोमळे, दिगंबर सुर्यवंशी, रोशन थेर, विलास देशमुख, पिंटू डोंगरे, सुधीर बडोले, रवि लोखंडे, चेतन चांदेवार यांसह सुमारे शंभराहून अधिक स्थानिक युवा सुशिक्षित बेरोजगारांनी ही संघटना आमच्या गावाच्या हक्कासाठी व आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असून कधीही एकत्र येत रस्त्यावर उतरून लढा देण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या