Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी माध्यामिक विद्यालयात क्रांती दिन व रक्षाबंधन साजरा.....,....................,....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-o९ ऑगस्ट २०२५ रोजी शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालयात क्रांती दिन व रक्षाबंधन हा कार्यक्रम माजी सैनिक यांच्या उपस्थित पार पाडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद रफिक यांनी क्रांती दिनानिमित्त सखोल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे माजी सैनिक प्रकाश लोखंडे, माजी सैनिक,कांबळे पवन व सामजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे हे उपस्थित होते. तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक मोमीन अजीज व सौ. डावळे एम.ए. यांनी क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारकाविषयी सखोल माहिती  दिली व रक्षाबंधनाचे महत्व पटवून दिले. तसेच व्यासपीठावर कणसे व्ही.एस, पर्यवेक्षक (स्काऊट मास्टर) सुगावे बालाजी उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वःताच्या कल्पकतेने राखी बनवून आणले. व वृक्षाचे संवर्धन व्हावे यासाठी पर्यावरणपूरक राखी बनवून वृक्षाला राखी बांधली व त्यातून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन याची जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन सौ. येलाले के.व्ही व पर्यवेक्षक सुगावे बालाजी यांनी केले. या उपक्रमाद्वारे भाऊ - बहिणीतील प्रेम, आदर आणि हक्काच्या पवित्र नात्याला रेशिम धाग्याने विणण्याचा आणि भावाने बहिणीच्या संरक्षण देण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेतील विद्यार्थिनी जाधव सुजाता तर आभार इंग्रजी विषयाच्या विभाग प्रमुख सौ. येलाले के.व्ही यांनी मांडले.यावेळी या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सौ नारागडे के.पी, सौ. बिरादार के.के, ,सौ. कनकुरे एम.एम, सौ. गायकवाड पी.एन, सौ. येलाले के.व्ही. कुरुळेकर एस.एन, सुमयाँ तांबोळी, सौ. जवळे जे. आर,  सौ. संगमवार एस.टी, सौ. भंडारे एस.जी, सौ. विशाखा कांबळे, जाधव रविप्रकाश, नाटकरे बालाजी, गायकवाड संजय, मैलारे एम.टी, पाटील राजकुमार, कणसे व्ही.एस, गायकवाड भिमकिरण,  मळभागे शिवानंद, माधव वाघमारे, कासले वैभव, भोसले अभिजित, विनित सुर्यवंशी,  उपस्थित होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, युवक, युवती उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या