Ticker

6/recent/ticker-posts

स्था.गु.शाखा लातुर व वाढवणा पोलिसांची जमली सांगड अवैध धंदेवाले म्हणतात नको रे बाबा आता ही भानगड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-जिल्हा पोलिस दलात नुकतेच मोठे बदल,फेरबदल झाले असल्याने जिल्हा पोलिस प्रमुख व ए.एस.पी, स्था.गु.शाखा प्रमुख,डी.वाय.एस.पी. यांच्यासह वाढवणा पो.स्टे.मधील सपोनि व पोउनि.हे सर्व अधिकारी नव्याने बदलून आल्याने जिल्हा पोलिस दलात तरतरी आली आहे. तसेच स्था.गु.शाखा व वाढवणा पोलिस यांची चांगली सांगड जमली असल्याचे चिञ नुकतेच शेळगाव ते हाळी रोडवर अवैध वाळू सह जप्त केलेल्या लाखोच्या मुद्देमालावरुन दिसून येते.तसेच ठाण्याच्या हद्दीत होत असलेल्या सर्वच गैर धंद्यावरील कारवायाकडे बघून स्था.गु.शा.लातुर व वाढवणा पोलिसांची जमली बेस्ट सांगड,नको रे बाबा आता बेकायदा धंद्याची भानगड.असे म्हटले जाते.
गत महिण्यात लातुरच्या पोलिस दलात मोठे बदल झाल्यामुळे तसेच डीआयजी.शहाजी उमाप यांनी तर विभागात विविध पथके पाठवुन रेड टाकायला सुरुवात केल्याने बहूतांश लोकांनी तोंड काळे करुन घेण्यापेक्षा काळे धंदे बंदच केलेले बरे,असे मनो मनी ठरवुन अन्य व्हाईट/चांगल्या धंद्यामध्ये गुंतल्याचे दिसते.
नाही म्हटले तरी १०० % धंदे बंद झालेले नसलेतरीही पुर्वीसारखे १००% चालू पण नाहीत.आणि याचे कारण म्हणजे वाढवणा पोलिस व स्था.गु.शा.पोलिस यांची जमलेली सांगड.यामुळे नको ती भानगड असे म्हणत अनेकजण अवैध धंद्यापासून ४ हात लांबच राहतात.आणि जे कोणी चोरी चुपके अवैध धंदे करत असतात.त्यांना मोठ्या शिताफीने पोलिसं ताब्यात घेतात.
डीआयजी.शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेञात येणा-या विविध पोलिस ठाण्यांना कांही महिण्यापुर्वी भेटी देऊन त्या-त्या ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात शांतता,एकात्मता कायम राहावी,यासाठी अवैध धंद्या-  वर छापेमारी करण्याचे टार्गेट दिले. व याच टार्गेटचा परिणाम म्हणुन या ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी,दारु,वाळू, मटका,गुटखा या अवैध धंद्यावर   स्था.गु.शा.पोलीसांसह वाढवणा पोलिसांनी रेड,मासरेड करुन लाखों रुपयांच्या मुद्येमालासह आरोपीतांना ताब्यात घेऊन अवैध धंदेवाल्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले म्हणुन वाढवणा पोलिस व स्था.गुन्हे शाखा लातुर पोलिस यांची जमली सांगड,नको रे बाबा अवैध धंद्याची भानगड असे म्हणत अवैध धंदे करणारे कांहीजण अंडर ग्राऊॅंड झाले आहेत.कारण,आजवर कधी झाली नव्हती इतक्या मोठ्या संख्येत वाढवणा पोलिसांनी मास रेड केली आणि पाण्याच्या जार मधून होणारी हातभट्टी दारुची वाहतूक व विक्री करणा-यांचा भांडाफोड केला.तसेच हातभट्ट्या उध्वस्त केल्या.आणि या व अन्य कारवाया मध्ये स्ञी,पुरुष आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
शेळगाव रोडवर फिल्म स्टाईल पाठलाग करत स्था.गु.शा.व वाढवणा पोलिसांनी वाहनासह लाखोंची वाळू व आरोपी ताब्यात घेतले.तसेच स्थागुशाचे पथक हळी भागात सतत गस्तीवर असते.आणि अशा कामासाठी गुप्त बातमीदाराची मदत ही होत आहे.
राजेश घाडगे
पोउपनि.स्थागुशा.लातुर..
वाढवणा हद्दीत सामाजिक शांतता व एकोपा कायम राहावा,म्हणुन आम्ही अहोराञ दक्ष आहोत.तसेच हद्दीमध्ये अवैध धंद्याचे नामोनिशान राहू नये, यासाठी धाडसञ चालू केले असून याकामी जनतेनी न भीता परिसरात चालणा-या चांगल्या-वाईट धंद्याची माहिती द्यावी.त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल.
सुनिल गायकवाड
सपोनि.वाढवणा...
अवैध धंदे मुळासकट उखडून टाकावेत.आणि सामाजिक शांतता, सलोखा कायम राहावी.यासाठी जेष्ठ अधिका-यांसह प्रशासन मेहनत घेत आहे.जिल्ह्यात छापे टाकुण अवैध धंदेवाल्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याने जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या