Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार श्री डी. टी. आंबेगावे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

चित्रा न्युज प्रतिनिधी  
सोलापूर: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व सत्य पोलीस टाइम्सचे संपादक श्री डी टी आंबेगावे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१८ ते २०२५ या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबईच्या वतीने गौरविण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकार स्वतंत्र संचालक राज्यमंत्री दर्जा, मिनिस्ट्री ऑफ स्टिलचे नामदार भरत नाना पाटील, आमदार विक्रांत दादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे बापू, महेश म्हात्रे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष जयप्रकाश पवार, युवा अध्यक्ष नितीन शिंदे, शिवसेनेच्या महिला नेत्या रंजनाताई शिंत्रे, संजय सावंत, पत्रकार प्रकाश शिर्के, अमोल वाटवे, गौराज जाधव, एकनाथ तांबवेकर, रिंकू खरे आदी मान्यवर उपस्थित होते. डी टी आंबेगावे विविध क्षेत्रांत कार्य करीत आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व मजुरांसाठी लढा, कोविड काळात, गोर गरीब कुटुंबांना अन्नधान्य व कपड्यांचे वाटप, महापुरुषांच्या जयंतीनिमित जागर, अपघातग्रस्त पत्रकारांस मदत, पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत, वृक्षारोपण, अनाथ मुलांना पुस्तकं व खाऊ वाटप, वृद्धाश्रमातील आजी आजोबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, पत्रकार व नागरिकांसाठी पत्रकार शिबिराचे आयोजन, कोविड काळात ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस बांधवांना मास्क व नाश्ता, पत्रकारांचा अभ्यास दौरा, दिव्यांग बांधवांना छत्री वाटप, वारकऱ्यांना प्रसाद वाटप, अपघातग्रस्त व्यक्तीस मदत, रुग्णांना फळं वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यान, पत्रकारावर होणारे हल्ले व खोटे गुन्हे थांबवणे, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण, कोविड काळात मास्कचे वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन, कोविड काळात कुटुंबांना घरपोच किराणा, पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयाकडे पाठपुरावा, कोविड काळात भिंतीवर पेंटिंग करून जनजागृती, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता आदी क्षेत्रांत डी टी आंबेगावे उल्लेखनीय कार्य करीत आहेत. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. डी टी आंबेगावे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या