चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-जागतिक आदिवासी (मूलनिवासी)दिवस निमित्त ऐतिहासिक अंबागढ़ किल्ल्याच्या रमणीय पायथाह्याशी जागतिक आदिवासी दिवस हजारों आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला.आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रैली चे आयोजन करण्यात आले.रैली मध्ये राजे बख्त बुलंद शाह यांचा भव्य पुतळा अकर्षणाचे केंद्र बिंदू होते. प्रथम गोबरवाही येथून आदिवासी बांधवांची भव्य रैली काढून ती तुमसर इथे पोहोचली व शहराचे भ्रमण करीत ती आंबागड किल्ल्यावर दुपारी २.३० वा. पोहोचली.किल्ल्याच्या पायथ्याशी मैदानावर आयोजित कार्यक्रम प्रसंगी गोंडी धर्म ध्वज मा.रवींद्र परतेकी यांचे हस्ते भुमक कैलाश ऊईके ,राजकुमार परतेकी यांचे अध्यक्षतेखाली प्रभाताई पेंदाम, अंबागड चे सरपंच गोपीचंद बावनकर,अशोक उईके,लक्ष्मीकांत सलामे,धर्मेंद्र ईळपाचे,मितरामजी उईके यांचे उपस्थितीत फडकाविण्यात आले.भंडारा_गोंदिया चे खासदार मा.श्री प्रशांत जी पडोळे ,
पश्चात माजी खासदार श्री मधुकर कुकडे, उद्घाटक सरपंच गोपीचंद बावनकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनबाजी अहाके ,ग्रीन हेरिटेज चे अध्यक्ष व सामा.कार्यकर्ते मो.सईद भाई शेख, आंधळगाव चे ठाणेदार श्री नितीन राठौड़,राजकुमार परतेती, ग्रा.प.उपसरपंच राजहंस कटरे,विकास मरस्कोले,सामा कार्यकर्ते प्रमोद कटरे,माजी केंद्र प्रमुख मितारामजी उईके, सौ दीपकन्य उईके,अशोक उईके,लक्ष्मीकांत सलामे,तथा संजय कावळे,अनिल जांभुळपाणे,श्रीपत कोकोडे,चेतन मसराम,मंजूर भाई शेख, नासीर पठाण आणि अनेक गावातून आलेले आदिवासी बांधव,भगिनी, मुले _मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रथम राणी दुर्गावती,बिरसा मुंडा, व बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार अर्पण करण्यात आले पश्चात पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.सूत्र संचालन जमजाळ गुरुजी यांनी केले तर प्रास्ताविक रोहित मरसकोल्हे यांनी.
मा.श्री मधुकर जी कुकडे, भुमप कैलाश जी उईके,गोपीचंद बावनकर, प्रभाताई पेंदाम सोनबा आहाके,प्रमोद कटरे ,लक्ष्मीकांत सलामे, ई नी मार्गदर्शन केले.मो सईद भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की_ "भारत हा एक असा देश आहे, जो आपल्या विविधसंस्कृती,परंपरा,भाषा,आणि वेगवेगळ्या समूदाय करिता जगात प्रसिद्ध आहे.या मध्ये एक महत्त्वाचा हिस्सा आहे_आमचा आदिवासी समूदाय. हा समूदाय न केवळ निसर्गाच्या सान्निध्यात राहतो,अपितु आमचा वारसा,लोककथा आणि पारंपारिक ज्ञानाला ही पिढी न पिढ्या जपून ठेवतो.आदिवासी दिवस चा उद्देश म्हणजे आदिवासी लोकांच्या अधिकारांचे रक्षण करणे,त्यांच्या योगदानाला सन्मान देणे आणि समाजात त्यांच्या महत्वाप्रति जागरूकता वाढविणे आहे". आदिवासी गोंडी नृत्य व लोककलेच्या माध्यमातून मुलींनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.प्रावीण्य प्राप्त आदिवासी मुला_मुलींचे तथा विशेष कार्य करणाऱ्या व काही सेवानिवृतांचे पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून प्रमुख पाहुणे हस्ते सत्कार करण्यात आले.या प्रसंगी जवळपास अडीच ते ३ हजार आदिवासी बांधव उपस्थित होते.हजारोंच्या संख्येने किल्ला पाहणाऱ्यांची तोबा गर्दी होती.गोंड राजे बख्त बुलंदशाह ने बांधलेल्या या किल्ल्याचे उर्वरित काम शासनाने त्वरित करावे अन्यथा या करिता आंदोलन उभारू अशी मागणी या प्रसंगी आदिवासी संगठण तर्फे करण्यात आली.सरपंच गोपीचंद बावनकर,धर्मेंद्र ईळपाचे,विकास मरस्कोले,आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते गावकरी ,नागरिकांनी या करिता परिश्रम व प्रयत्न केले.
0 टिप्पण्या