Ticker

6/recent/ticker-posts

विधवा महिलेला धमकी देऊन दुकानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीना दोन दिवसात अटक करण्याची मागणी.

 दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास संपुर्ण नाभिक समाज रस्त्यावर उतरून आदोलन करण्याचा ईशारा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
बल्लारपूर : शहरातील झाशी राणी चौक येथे असलेल्या नाभिक समाजाच्या पारंपरिक सलून व्यवसायावर अन्यायाचा अकल्पनीय प्रकार समोर आला आहे. स्व. विजयराव हरिभाऊ लक्षणे यांच्या नावावर गेली ४०-५० वर्षांपासून चालत असलेलं सलून दुकान बळकावण्याचा प्रकार उघडकीस 
या बाबत सविस्तर माहिती अशी कि गेल्या चाळिसते पन्नास वर्षापासून झासी चौक बल्हारपुर येथे मय्यत विजयराव लक्षणे यांचे सलुनचे दुकान चालु होते. यानंतर विजयराव यांचे निधन झाले. यानंतर यांचा मुलगा अरविंद लक्षणे यांनी चालविले दोन वर्षा नंतर अरविंद यांचे निधन झाल्यानंतर घरचा कर्ता व्यक्ती गेल्यानंतर  यांची पत्नी श्रीमती शितलताई संपुर्ण घरातील व दोन लहान मुलाची जबाबदारी श्रीमती शितलताई लक्षणे यांच्यावर आली. शितलताई यांची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे आणि मुले लहान असल्या कारणाने या दुकान चालवु शकत नसल्यामुळे आपल्याला थोडीफार आर्थीक मदत होईल या उद्देशाने शितलताई यांनी दुकान किरायाने देण्याचा निर्णय घेऊन दुकान किरायाने दिले असता दुकाना शेजारील जांभुळकर काकु आणि रामटेके यांनचे जावई पवन भगत यांनी हि जागा  माझ्या सासऱ्याची असल्याचा दावा करीत त्यांनी शितलताई यांच्या घरी जाऊन धमकी दिली. कि दुकान किरायाने दिल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील दुकान किरायाने देण्यास अडविण्याचा प्रयत्न केला. यांच्या प्रयत्नाला न जुमानता येथे दुकान चालू केले. असता रात्री रामटेके यांनचे जावई पवण भगत यांनी दुकानाची तोडफोड केली. या प्रकाराविरोधात जय जिवाजी क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नाभिक समाजाने एल्गार पुकारला विशेष सत्य म्हणजे या दुकानाचा कायदेशीर टॅक्स आजही स्व. विजयराव लक्षणे यांच्या नावावरच आहे.
दावा करणाऱ्यांकडे कोणतीही मालकी हक्काची नोंद, कागदपत्र किंवा पुरावा नाही.

हा प्रकार म्हणजे नाभिक समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर व प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे.

या वरील प्रकरणाची  तहसील कार्यालयाय बल्लारपुर येथे निवेदन  देऊन याप्रकरणी दोन दिवसात निर्णय न झाल्यास मोठा आंदोलनाचा इशारा देत
 तहसील कार्यालयावर जय जिवाजी क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो नाभिक बांधवांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपरिषद मुख्याधिकारी व वनविकास महामंडळ माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांना निवेदन दिले.
यावेळी जय जिवाजी क्रांती सेना – महाराष्ट्र राज्य व बल्लारपूर-बामणी येथील सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर
देवेंद्रजी वाटकर – सल्लागार, महाराष्ट्र राज्य,गणेश वनकर – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य,
पंकज श्रीवास्तव – कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य,मिथुन हनुमंते – अध्यक्ष, बल्लारपूर, गजानन चांदेकर, श्रीकांत चौधरी, बादल लांडगे, रजनीश (पप्पू) जम्पलवार, नरेंद्र निंबाळकर, महेश मुरारी, सुरज टोमटे, राकेश वडस्कर व 
समाजाचा इशारा – निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरणार!
जय जिवाजी क्रांती सेनेने आणि उपस्थित समाजबांधवांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "जर दोन दिवसांत या प्रकरणात न्याय न मिळाल्यास संपूर्ण नाभिक समाज रस्त्यावर उतरेल आणि मोठं जनआंदोलन छेडेल!"
हा लढा फक्त एका दुकानाचा नसुन हा लढा  नाभिक समाजाच्या श्रम, प्रतिष्ठा आणि हक्कांचा! आहे.जय नाभिक समाज | जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्यचे देवेंद्रजी वाटकर – संस्थापक सल्लागार
गणेश वनकर – संस्थापक अध्यक्ष,मिथुन हनुमंते – अध्यक्ष, बल्लारपूर शहर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या