Ticker

6/recent/ticker-posts

हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत महापालिकेत रांगोळी, राखी व पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

विजय चौडेकर चित्रा न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नांदेड,

नांदेड :- शासनाच्या निर्देशानुसार हर-घर तिरंगा मोहिमेंतर्गत महापालिकेच्या वतीने आज दि.०८.०८.२०२५ रोजी कै.शंकरराव चव्हाण सभागृह परिसर नांदेड या ठिकाणी महिला बचत गटांच्या रांगोळी व राखी बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा २०२५ या कार्यक्रमांतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोइफोडे* यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कै.शंकरराव चव्हाण सभागृह परिसर नांदेड या ठिकाणी हर घर तिरंगा मोहीम २०२५ पहिल्या टप्प्या अंतर्गत महिला बचत गट रांगोळी व राखी बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी उपस्थित सर्व महिलांनी हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत शपथ ग्रहण केली व नंतर रांगोळी आणि राखी बनविणे या स्पर्धेत सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धा व राखी बनविणे स्पर्धेचे निरीक्षक म्हणून क्रीडा अधिकारी रमेश चौरे तसेच भांडार अधीक्षक नागनाथ पतंगे यांनी निरीक्षण करून स्पर्धकांची निवड केली. याप्रसंगी हर घर तिरंगा कॅनव्हास वर सह्या करणे बाबतच्या मोहीमे अंतर्गत उपस्थितांनी कॅनव्हास बोर्डवर सह्या करून आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाकरिता DJAY (S) योजनेतील बचत गटातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

त्याचप्रमाणे हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत महापालिकेच्या 14 शाळामध्ये 2980 विद्यार्थी शिक्षण घेत असूनमहापालिकेच्या शिक्षण विभागा तर्फे सर्व शाळांमध्ये तिरंगा प्रदर्शन, भिंतीची सजावट, भारतीय जवानांना पत्र लेखन, विविध स्पर्धा, प्रभात फेरी, गित गायण, चित्रकला, माजी सैनिकांना शाळा स्तरावर आमंत्रित करुन शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले, भारतीय जवानांना शाळा स्तरावर  मुलींनी हस्तकलेतून 1000 राख्या तयार करून पोस्टाच्या माध्यमातून जवानांना पाठविण्यात आल्या आहेत.

सदरील कार्यक्रम *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या निर्देशाने व उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नियंत्रणात पार पाडन्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता DJAY (S) विभागातील व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी, चंद्रकांत कदम, प्रवीण मगरे, अमोल देशपांडे व समुदाय संघटक विश्वास देशमुख, गजानन बागल, मुकुंद एडके, अंकुश वाघमारे,श्रीमती कीर्ती ओपळे, श्रीमती शाकेरा बेगम, शिक्षण विभागाचे संदीप लबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

"हर घर तिरंगा" या अभियाना अंतर्गत दि.०२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन महापालिकेतर्फे करण्यात येणार असून दि.१०.०८.२०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता तिरंगा बाइक रैलिचे व सायंकाळी ६.०० वाजता विसावा उद्यान येथे देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन नांदेड शहरातील सर्व सुजान नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी या आयोजित होणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आह

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या