Ticker

6/recent/ticker-posts

शीतला माता मंदिर परिसरात ग्रीन हेरिटेज तर्फे स्वच्छता,तुळस लागवड व तुळस दान कार्यक्रम साजरे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-ग्रीन हेरिटेज सामाजिक व पर्यावरण संस्थे च्या वतीने आदिशक्ती शीतला माता मंदिर येथील परिसरात स्वच्छता मोहीम, तुळस लागवड,तुळस दान कार्यक्रम घेण्यात आले.
या प्रसंगी मंदिर ट्रस्ट समितीचे*अध्यक्ष इश्र्वरलाल काबरा,इंदिरा देवी काबरा, ग्रीन हेरिटेज चे संस्थापक/अध्यक्ष मो.सईद शेख,उपाध्यक्ष चंदा मुरकुटे, नीता मलेवार,संस्कार भारतीचे प्रा.सुमंत देशपांडे, घनश्याम धुर्वे, अतुल वर्मा,मोहन अग्रवाल,वसंत कुर्वे सोबतच कल्पना* चांदेवार(योग शिक्षिका शीतला माता मंदिर),शुभांगी घोगरे,मंगला माकडे,उज्ज्वला मानापुरे,गौरी सक्सेना,कृष्णा कृपाने,हिरालाल लांजेवार,दिलीप सिंग* भारद्वाज,अंकुश हलमारे,रामेश्वर येळणे,देशकर आणि काही भाविक ई नी यात सहभाग घेतला.
प्रा.देशपांडे यांनी या प्रसंगी "तुळस हिंदू धर्मात पवित्र मानली जाते व देवी लक्ष्मी चे रुप मानले जाते.धार्मिक दृष्ट्या देखील*पुज्यनिय आहे"असे प्रतिपादन केले तर सईद शेख यांनी "तुळस चे भारतीय संस्कृतीत व आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीच्या सुवासाने मंदिर,मठाचे पर्यावरणीय शुद्धीकरण व*पावित्र्य जपले जाणार असे मनोगत व्यक्त केले*
चंदा मुरकुटे, नीता मलेवार यांनी या उपक्रम करिता मंदिरास तुळस दान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या