Ticker

6/recent/ticker-posts

प्रभुसेवा टिम चंद्रपुर यांच्या पुढाकाराने घडुन आनली एका मिक्सिन्ग महिलेची कुटुंबियांची भेट.



प्रभुसेवा टिम व पोलीस दादांचे या कुटुंबियांनी सर्वांचे आभार मानुन यांच्या डोळ्यातून आनंदा असरु तरारले.



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती / चंद्रपुर : दिनांक 8 ऑगस्ट 2025 ला सकाळी 8 वाजता बाबूपेठ चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन या उड्डाण पुला खाली एक महिला प्रभू बेवारस अवस्थेत आढळल्या, चेहराच्या डावा डोळा व डाव्या बाजूने डोक्यावर मार लागलेल्या, रक्ताने माखलेल्या अवस्थेत विक्षिप्त अवस्थेत प्रभू सेवा टीमला आढळल्या.. सकाळी 9 वाजता  पासून सर्व प्रभू सेवा टीम ह्या महिला प्रभूला घेऊन शासकीय इस्पितळात वैद्यकीय उपचारासाठी ह्या वॉर्ड मधून त्या वॉर्ड मध्ये फिरले.  फिरून फिरून सगळ्यांची दमछाक झाली , पण पूर्णपणे उपचार होत पर्यंत दुपारचे 3  वाजले.आणि उपचार झाल्यानंतर प्रभू सेवेच्या टीमने शासकीय रुग्णालयामधील पोलीस चौकीचे मेजर बारेकर साहेब  यांनी प्रभू सेवा टीमला भरपूर सहकार्य केले व चंद्रपूर शहरी पोलीस स्टेशन गाठून महिला प्रभूची तुटक तुटक  महिला प्रभूने सांगितल्या प्रमाणे माहिती देण्यात आली. ह्या महिला प्रभू गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून मुधोलि चेक नंबर 2 ह्या गावातून गेल्या एक महिन्या पासून मिसिंग होत्या.अगोदर चामोर्शी ग्रामीण पोलिस स्टेशनला संपर्क साधून चौकशी केली. त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी आष्टी तालुका पोलिसांशी संपर्क साधून ही महिला प्रभू त्यांच्या पोलीस स्टेशन अंतर्गत मिसिंग आहे काय याची खात्री करून घेतली, मिसिंग असल्याची माहिती मिळाली. आष्टी पोलिसांनी चंद्रपूर शहरी पोलिस स्टेशनला संपर्क साधून शहानिशा केली... आष्टी पोलिसांनी ह्या महिला प्रभूच्या आई आणि बहिणीला सोबत घेऊन चंद्रपूर येथे शहरी पोलिस स्टेशनला येऊन प्रभू सेवा टीमने चंद्रपूर यांच्या मार्फत मिसिंग महिला प्रभूची भेट त्यांच्या कुटुंबियांना करून दिली महिला प्रभू सुखरूप गावाला पोहोचले त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आणि प्रभू सेवा टीमचे त्या कुटुंबियांनी या सर्वांचे खूप खूप आभार मानुन  यांच्या चहऱ्यावर हास्य फुलुन डोळ्यातून आनंदा असरु तरारले. यावेळी उपस्थित प्रभु सेवा संस्था चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष - रमेश हनुमंते आणि यांची संपुर्ण टिम  होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या