प्रतिनिधी - श्रीकांत बाराहाते, हींगोली
हिंगोली:- जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथे हिंगोली जिल्हाधिकारी माननीय श्री राहुल गुप्ता सर यांनी भेट दिली. यावेळी ग्राम पंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महाविदयालये यांना भेटी देऊन, महसुल विभाग व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज हास्वराज अभियान राबविण्यात आले. शेतकऱ्यांना जिवंत सातबारा, वारसा प्रमाणपत्र, मनरेगा अंतर्गत कामे या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी माननीय जिल्हाधिकारी मा श्री राहुल गुप्ता सर यांचे गिरगाव ग्राम पंचायतच्या वतीने रोपटे देऊन स्वागत केले, माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ग्राम पंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी उपविभागीय अधिकारी श्री विकास माने सर, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी उज्वला मेड, माजी सरपंच देविदास पाटील, माजी उपसरपंच विलासराव नादरे पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कऱ्हाळे पाटील, ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी श्री कदम साहेब, गाव प्रतिनिधी सरपंच पुनम प्रमोद नादरे, ग्राम पंचायत सदस्य, आशाताई, विध्यार्थी आणि शक्तिपीठ बाधीत शेतकरी उपस्थित होते, यावेळी जिल्हाधिकारी यांनी शक्तिपीठ बाधीत शेतकऱ्यांच्या भावना व म्हणणे ऐकुन घेतले, व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रेरणादायी विचार व्यक्त केले, कै. बेगाजी पाटील विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक आणि हुतात्मा बहिर्जी विद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात मध्ये उपस्थिती लाभली होती.
0 टिप्पण्या