Ticker

6/recent/ticker-posts

लाडकी बहीण योजनेत १४२९८ पुरूषांची घुसखोरी;बिरसा फायटर्सची कारवाईची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :मुख्यमंत्री लाडकी बहिण महिलांच्या योजनेत पुरूषांनी घुसून लाभ घेतलेल्या पुरूषांची सखोल चौकशी करून रक्कम वसूल करून कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,पत्रकार मंगेश वळवी, बिरसा फायटर्स जुगनी गाव  शाखेचे अमिताभ वळवी,गणपत वळवी,गुलाबसिंग पाडवी,पोहल्या पाडवी, आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
                          महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" २८ जून २०२४ रोजी सुरू  करण्यात आली आहे.या योजनेत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये असा आर्थिक लाभ डिबीटी द्वारे देण्यात येतो.या लाभासाठी फक्त विवाहित, विधवा,घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला व कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र असते.लाभार्थी कुटुंबातील उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. अशी अट असतांना महिलांच्या नावाने काही पुरूष या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
एकूण १४२९८,पुरूषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे ४८०० कोटींचा घोटाळा या योजनेत झाला आहे.महिलांच्या या योजनेत पुरूष घुसलेत कशे? हा मोठा प्रश्न निर्माण होतो.तसेच ज्या महिला नोकरी करतात, ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न २.५० पेक्षा अधिक आहे,अशा महिलांनीही लाभ घेतला आहे.
          लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी योजना असतांना १४२९८ पुरूषांनी या योजनेत घूसून बेकायदेशीररित्या दरमहा १५०० रूपयांचा लाभ घेतला आहे.त्यांनी शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली आहे.म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घुसून लाभ घेतलेल्या पुरुषांकडून रक्कम वसूल करून कायदेशीर कडक कारवाई करावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या