Ticker

6/recent/ticker-posts

सर्जा-राजांच्या सजावटीचे साहित्य आले हंडरगुळीच्या बाजारात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-भारतीय हिंन्दु संस्क्रतीत बैल पोळा या सणाला अन्नन्यसाधारण म्हत्व आहे.विशेष म्हणजे बळीराजांसाठी हा सण खुपच आवडीचा असतो.
कारण,वर्षभर शेतातील विविध कामे करवुन घेतलेल्या व जिवापाड जपलेल्या बैलांचा सण असलेल्या पोळ्यासाठी गुरांना विशेषत: बैलं व गाय यांना धुवून,पुसून त्यांची विविध रंगी वारनेसने शिंगे रंगवतात.तसेच पोळ्याच्या दिवशी मारोती मंदीरा भोवती फिरविण्यापुर्वी गुरांना रंगी बेरंगी घुंगर माळा,मटाटी,म्होरकी इ. साहित्यांनी सजवितात.आणि अशा साहित्यांची दुकाणे येथील आठवडी बाजारात थाटली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दर वर्षी श्रावणातील शेवटचा सोमवार संपताच चौथ्या दिवशी हा सण असतो.आणि यंदा ही हा सण दि.२२ रोजी आला असल्याने दि.१७ वार रविवार या रोजीच्या आठवडी बाजारात सर्जा-राजांच्या सजावटीचे साहित्य विक्री स्टाॅल येथील बाजारा मध्ये थाटल्याचे दिसून आले.
या वर्षी सजावटीच्या साहित्यांचे दर वाढले नसलेतरीही यासाठी लागणारे राॅ मटेरियल व मजुरवर्ग यांचे दर वाढल्याची माहिती विक्रेते संभाजी माने यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना दिली आहे.
सर्जा-राजांच्या सजावटीचे साहित्यां च्या जोडीचे दर खालील प्रमाणे.
मटाटी-१००x२
घुंगरमाळ-२००x२
मोरकी-५०x२
गोंड्याचा कन्ना-४०x२
वेसन-४०x२
कंबर पट्टा-५०x२
बाशिंग-५०x२
घाटी-१००x१,१७५x२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या