Ticker

6/recent/ticker-posts

मंत्रालयाचा आदेश एका तासात बिरसा फायटर्सने बदलला; पालक खूश!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार  :कक्ष अधिकारी,आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक यांना दिनांक २१/०८/२०२५ रोजी पाठवलेले पत्र रद्द करून नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगांव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील नामांकित शाळेतील इयत्ता ३ री तील विद्यार्थांचे समायोजन करा,अन्यथा विद्यार्थी, पालकांसोबत बिरसा फायटर्स संघटना बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री,मंत्रालय मुंबई व सचिव, आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथे देण्यात आले.
                            नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगांव  येथील इयत्ता ३ री च्या शैक्षणिक, आरोग्य आणि विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती असमाधान अशा समस्या सांगत पालकांनी आपल्या विद्यार्थांना इतर शाळा बदल मिळावी,म्हणून प्रकल्प अधिकारी नंदूरबार यांच्याकडे दिनांक ०७/०४/२०२५ रोजी मागणी केली होती. बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी नंदूरबार यांना १९/०६/२०२५ रोजी निवेदन दिले होते. अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक यांना प्रकल्प अधिकारी नंदूरबार यांनी दिनांक ३०/०६/२०२५ रोजी पत्र पाठवले होते.आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी सचिव, आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई-३२ यांना दिनांक २१/०७/२०२५ रोजी पत्र पाठवले होते.
                   कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र राज्य यांनी मा.आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक यांना  दिनांक २१/०८/२०२५ रोजीच्या दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की,आदिवासी विकास विभाग,शासन निर्णय क्र. नानिशा-२०२१-प्र्.क्र. ९९ (भाग १)/ का.१२ दिनांक ९/१२/२०२२ मधील विहीत तरतुदीनुसार नामांकित योजनेंतर्गत इयत्ता १ ली मध्ये प्रवेशित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थांचे समायोजन व इतर नामांकित शाळेमध्ये करणे अनुज्ञेय नाही.सदर तरतूद विचारात घेऊन तसेच सद्यस्थितीत सन २०२५-२०२६ शैक्षणिक वर्ष सुरु झाले असल्याने नामांकित योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या नामांकित शाळा बदलीचे प्रस्ताव अमान्य करण्यात येत आहेत.असे मा.आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक यांना कळविले होते.
                     कक्ष अधिकारी यांचा हा आदेश दुजाभाव करणारा व विद्यार्थी व  पालकांवर अन्याय करणारा आहे,असे  म्हणत बिरसा फायटर्स संघटनेने दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालयात दिले.
त्या निवेदनाची दखल घेत एका तासात त्याच दिवशी कक्ष अधिकारी यांनी  आदेश बदलून आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना नवीन आदेश दिला आहे.विद्यार्थांचे समायोजन करण्याचे निर्देश देण्यात येत आहे,असा आदेश काढल्याचे पालक खूश झाले आहेत. पालकांनी बिरसा फायटर्सचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या