Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका,मुलींचे मोफत शिक्षण लवकरात लवकर अमलात आणा आणि देवाभाऊला सद्बुद्धी येऊ दे रे बाप्पा असे फलक लावून ओबीसी क्रांती मोर्चाने गणपती बाप्पाकडे घातले साकडे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा ;- जिल्हात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि घरगुतीची गणपतीची स्थापना करण्यात आली आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे थीम तयार करण्यात आले अशाच प्रकारे भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथिल ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते यांनी घरगुती मांडले असून ओबीसी,एससी एसटीशिष्यवृत्तीच्या रकमेत 15 वर्षांपासून वाढ नाही ती वाढ करावी,मुलींचे मोफत शिक्षणासाठी कायदा अमलात आणावा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अश्या वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा समोर फलक लावून राज्य सरकार आणि देवाभाऊला सतबुद्धी येऊ दे रे बाप्पा ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते यांनी साखडे घातले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या