चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चौधरी, प्रमुख अतिथी प्रा. विलास अम्बाडकर, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. आतिश कोहळे तसेच प्रमुख वक्ते म्हणून उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील श्री. श्रीकांत गोहाड मंचावर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यावेळी श्री गोहाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना युवा पिढीचे देशाच्या विकासाच्या मार्ग पथावर काय कार्य आहे आणि आजचा हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून का साजरा केला जातो याचे महत्त्व पटवून दिले तसेच मा. वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय मोर्शी डॉ. प्रमोद पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात रेड रिबिन क्लब स्थापन करण्यात आला. रेड रिबिन क्लब ही संकल्पना एचआयव्ही/एड्स जागरूकता निर्माण व्हावी म्हणून रासेयो च्या माध्यमातून राबविली जाते.यावेळी प्रयोग शाळा तंत्रज्ञ सुवर्णा श्रीराव यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणातून युवा नेतृत्व आजच्या काळाची गरज आहे आणि भारत हा युवांचा देश आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये युवांनी हातभार लावण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. सोनल धर्माळे यांनी तर प्रस्ताविक डॉ. अविनाश उल्हे यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. विजया चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी अविनाश उल्हे, महिला कार्यक्रम अधिकारी विजया चव्हाण, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत इखे , डॉ. गिरीश कांबळे, डॉ. रवी धांडे, डॉ. गजानन हरडे, डॉ. गजानन रावते, प्रा. नितीन कोळेकर, डॉ. सोनल बाकडे, डॉ. नहाटे आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या