चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : भाऊतात्या कृषी सेवा केंद्र चांदसैली ता.शहादा जि.नंदुरबार येथील दुकानदाराने कापूस पिकावर चूकीचे औषध फवारणीसाठी दिल्याने शेतकरी मद्रास उदय वळवी राहणार चांदसैली तालुका शहादा यांच्या अडीच एकर शेतातील ५ पिशवी पेरणी केलेले कापसाचे पूर्ण पिक मेले आहे.त्या शेतक-यास नुकसान भरपाई मिळावी व चुकीचे औषध देऊन शेतक-यांची फसवणूक करीत मोठे आर्थिक नुकसान करणा-या दुकानदारावर कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जगदीश डुडवे, जितेंद्र भंडारी,जंत्र्या पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्य़ात शेतात बी पेरल्यानंतर फवारणीसाठी औषधे व खते घेणा-या शेतक-यांची संख्या कृषी सेवा दुकानात वाढली आहे.नंदूरबार जिल्हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.बरेच शेतकरी हे अशिक्षित व अडाणी आहेत.त्याचा गैरफायदा घेऊन भाऊतात्या कृषी सेवा केंद्र चांदसैली ता.शहादा जि.नंदुरबार येथील दुकानदाराने चांदसैली गांवातील शेतकरी श्री. मद्रास उदय वळवी यांना कापूस पिकावर फवारणीसाठी बुरशीनाशक अम्बीशन, सुजला व इतर चुकीचे औषध दिल्यामुळे अडीच एकर शेतातील सुमारे ५ पिशवी कापूसचे पीक मेले आहे. सदर शेतक-याने दुकानदाराकडे तक्रार केल्यानंतर दुकान दाराने पुन्हा चुकीचे औषध दिले.अशे वारंवार चूकीचेच औषध दुकानदार देत असल्यामुळे शेतातील कापसाचे पीक मरण पावले आहे.शेतातील कापसाचे पीक मेल्यानंतर दुकानदाराने शेतकऱ्यास १ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला.१ हजार रूपयांत एवढी मोठी नुकसान भरपाई होणार नाही.यावरून दुकानदाराची चूक लक्षात येते व दुकानदाराला पिकांसाठी फवारणी करण्याचे औषधाबाबत माहिती नाही,असे दिसून येते.त्यामुळे सदर दुकानदाराकडून अनेक शेतक-यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.दुकानदार बोगस व चूकीचे ओषध विकून शेतक-यांची फसवणूक व लुबाडणूक करीत आहे.
बोगस व चूकीच्या औषधांमुळे पिकांची वाढ होण्याऐवजी पीक मेले आहे.शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
0 टिप्पण्या