Ticker

6/recent/ticker-posts

बा रायगढ़ परिवार तर्फे मेंढा भंडारा येथील पुरातन हेमाडपंथी गोसावी मठ मंदिर येथे दीपोत्सव,पूजा पाठसह स्वच्छता मोहीम


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा :-संपूर्ण महाराष्ट्रात बा रायगड परिवार पुरातन गडकिल्ले, मठ,समाधी इत्यादीचे संरक्षण व जतन व्हावे याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता स्वतः स्वच्छता मोहीम राबवत असते. त्या अनुषंगाने भंडारा शहरालगत  मेंढा  येथील 800 वर्षापूर्वीचे हेमांडपंथी पुरातत्त्व  गोसाई मठा ची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, ज्या मध्ये चिमुकल्या बालकासह ३०_३५ तरुण_ तरुणी व ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता.
    स्वच्छता मोहीम समारंभाच्या अध्यक्षस्थानी भंडारा येथील इतिहासकार मोहम्मद सईद शेख सर होते, प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक राजूभाऊ खवसकर, गोसाई मठाचे ट्रस्टी व अध्यक्ष किशोर गिरी   यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अध्यक्षिय भाषणात सईद  सर यांनी 800 वर्ष पूर्वीचे गोसाई मठ व त्याविषयी पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन यांनी घेतलेली काळजी व संवर्धन तसेच या मठाला अलोनी बाबा मठ म्हणून प्रसिद्धी मिळाली होती त्यात साधुसंत वास्तव्यांनी होते, चतुरनाथ महारज , गोविंद गिरी महाराज, शंकर गिरी महाराज यांचे आठव्या पिढीचे वारस किशोर गिरी हे या मठाची देखरेख करीत असतात. या मठात त्याकाळी ७ संतांचे सात स्मारक बांधण्यात आलेले होते. एकूण पाऊण एकर जागेत गोसावी मठ आहे अशी इत्तीबूत माहिती दिली.
     इ. स.1130 च्या काळात गोसाई मठात  विठ्ठल रुक्माई,भगवान विष्णू,शिव, बाळ हनुमान व राखडी देवीची मूर्ती.त्यानंतर गणेशजीं मूर्ती  स्थापनाची वेळी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी या ठिकाणी आले होते हे असे सांगण्यात येते. हेमाडपंती रचनेचे शिल्प अतिसुंदर व वेगवेगळ्या मंदिराची स्थापना त्यातील कोरीव काम आकर्षक व मनाला भेदून जातात परंतु अशा पुरातत्त्व वास्तूकडे जनतेची व शासनाची दुरी मिटावी म्हणून बा रायगड परिवारातर्फे असे स्वच्छता मोहिमेचे उपक्रम मेंढा येथील गोसाई मठात राबविण्यात आले.
        गोसाई मठाची विशेष देखरेख व्हावी म्हणून गोसाई मठाचे आठव्या पिढीचे वारस किशोर गिरी अध्यक्ष, मोहम्मद सईद सर सचिव व इतर गावकऱ्यांच्या मदतीने २० वर्षापूर्वी ट्रस्ट स्थापन तयार करण्यातआले. त्यानुसार पुरातत्व विभागाकडून मिळालेल्या निधीतून गोसावी मठाची संरक्षण भिंत, गेट, मूर्ती संरक्षण इत्यादी कामे करण्यात आली.
 परंतु या मठाची वारंवार स्वच्छता व मठाची सुरक्षितता लक्षात घेता *"बा* *रायगड* "परिवाराकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व मठातील देवी देवतांच्या मूर्तीचे गंगा जलानी स्नान करून दीपोत्सव व पूजापाठ करण्यात आली. तब्बल ३०वर्षानंतर या ठिकाणी दीपोत्सव केल्याचा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला.
       समाधी मठ स्वच्छता मोहिमे प्रसंगी ट्रस्ट अध्यक्ष किशोर गिरी, सचिव सईद शेख,नीलकंठ मंदुरकर, मनोहर बादशाह,सेवक चंदनबटवे,बा_रायगड चे अध्यक्ष श्रीधर वडे ,प्रशांत गोरले यांचे सह बा रायगड परिवारातील, दीपक पिकलमुंडे, रवी सेलोकर, मुकेश नेताम लोकेश आखरे सौरभ गभने,रोशनी झोड, सुहानी ढोबळे,  स्वप्नील वडे, अभिलास मोटघरे,उमेश मोटघरे जय जुमळे ,अंकित मोटघरे ,सौ आरती गभने, सौ.साक्षी स्वप्निल वडे, सौ निशा मोतीवार, सौ सुजाता भोयर,शुभांगी चौधरी,सौ कविता टांगले, सौ वैष्णवी वडे, कुमारी दर्शना, या डहाके,कुमारी प्रणवी डहाके, शिव वडे इत्यादी सह बालगोपालांना मान्यवर पाहुणे हस्ते स्वच्छता दूत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
 प्रेषक:*श्रीधर वडे,अध्यक्ष._बा रायगड परिवार*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या