चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-येथे व परिसरात घरोघरी गौराईचे स्वागत भक्तीमय व मंगलमय,आनंदी वातावरणात संपन्न झाले.
यावेळी महिला भगीनींसह बाल गोपालांमध्ये मोठा उत्साह व आनंद दिसत होता.या भागात महालक्ष्मी या सणाला खुप म्हत्व असून विविध प्रकारचे देखण्या मुर्त्यांसह अत्यंत चांगल्याप्रकारची सजावट व आरास केल्याचे दिसून आले.
आॅनलाईन दर्शन व शुभेच्छा
पुर्वी म्हणजे मोबाईल येण्याअगोदर लक्ष्म्या पाहण्यासाठी आवतन दिले जायचे.म्हणुन जेष्ठांसह बच्चे कंपनी घरोघरी उजाडल्यापासून ते राञी १० पर्यंत गौराई बघण्यासाठी घरो घरी जायचे व शुभेच्छांची देवघेव करायचे.तसेच केलेल्या सजावटीचे कौतूकही करायचे.पण मोबाईल आले आणि गौराई बघणे व शुभेच्छा देणे,हा कार्यक्रम मोबाईलवरच सुरु झाला.सध्या सर्वञ वाट्सअप व स्टेटसवरील फोटो बघूनच गौरीच्या सजावटीचे कौतूक व शुभेच्छा दिल्या जातात.


0 टिप्पण्या