Ticker

6/recent/ticker-posts

नागार्जुन सुरई ससाई भंतेजीयांचा वाढदिवस उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :-समता सैनिक दल शितलवाडी तर्फे नागार्जुन भंतेजी सुरेश ससाई यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी महिलांनी आठ दिवसा अगोदरच व्यवस्थितपणे हाताळून कार्यक्रमाचे प्रयोजन केले मंजुषा बुद्ध विहार मनसर येथून आलेल्या रॅलीचे समता सैनिक दलाच्या सर्व कार्यकर्त्या अध्यक्षाच्या उपस्थित टी पॉइंट येथे हजर राहून भंतेजींना,मोठ्या मनोभावाने हार पुष्पगुच्छ अर्पण करून आणि त्यांचे पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे जावो अशी तथागत बुद्ध चरणी प्रार्थना करून धम्मर्याली रामटेक आंबेडकर पुतळ्याकडे रवाना झाली तिथे भंतेजीच्या शुभ हस्ते जय भीम च्या घोषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून रॅली पुढे नागार्जुन बुद्ध विहारा कडे निघाली तिथे बुद्ध गीताचा कार्यक्रम मंगल याचना करून समता सैनिक दलाने मोठ्या प्रेम भावनेने समापन केले त्यावेळी कार्यकारणी दलाच्या वैशाली वाघमारे यांनी परिश्रम घेतले त्यांनाच सोबती दलाच्या सर्व कार्यकारी मंडळ तारा मेश्राम, मनोरमा राऊत मंदिरा,वासनीक कांचन गायकवाड अंजली गेडाम, ज्योती धारगावे, स्मिता झीबे रमा उके सारिका धारगावे शीला साहारे, प्राजक्ता हुमणे, माधुरी नंदेश्वर स्वाती लोणारे ,इत्यादी सर्वांनी उपस्थिती दर्शवली यावेळी नगरातील लहान मोठे सर्वच उपासक उपाशी का मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व परिसर बुद्धमय झाला होता शेवटी आभार प्रदर्शन वैशाली वाघमारे यांनी केले ,जय भीम नमो बुद्धाय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या