चित्रा न्युज प्रतिनिधी
आगरगाव- देवळी नजीक आगरगाव येथील आदिवासी फासेपारधी समुदायाच्या मुलांसोबत वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी फासेपारधी समुदायातील मुलांमध्ये शिक्षणाप्रती रुची निर्माण व्हावी आणि पारधी समुदायातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे याकरिता शालेय साहित्याचे वितरण करून कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष आम्रपाल कांबळे यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस सगळेच आनंदाने साजरा करतात मात्र तळागाळातील गरजू गरीब वंचित दुर्बल घटकांसोबत वाढदिवस साजरा करावा हे खूप कमी लोकांना म्हणजे ज्यांना समाजाची जाणीव आहे
त्यांना कळते.त्यातीलच एक आम्रपाल कांबळे सर यांनी आपला मुलगा निहित आम्रपाल कांबळे याचा वाढदिवस आगरगाव पारधी वस्तीवर केक कापून व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा केला आणि त्यानि वाढदिवसाचं औचित्य साधून पारधी समुदायांमध्ये शिक्षणाप्रती कुठलीच कमी राहू नाही म्हणून पारधी समुदायातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वितरणही केले यावेळी आम्रपाल कांबळे सर म्हणाले की आम्हाला आदिवासी फासेपारधी समुदायासोबत वाढदिवस साजरा करताना अत्यंत आनंद होत आहे समाजातील असा घटक ज्यांच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि त्यांना मदत करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद आहे आम्ही यापुढेही आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पारधी समुदायाच्या विद्यार्थ्यांकरीता नेहमीच मदत करीत राहू असे मत यावेळी कांबळे सर यांनी व्यक्त केले तर विशेष कार्यकारी अधिकारी राजू थुल सर म्हणाले की पारधी समुदायाने सुशिक्षित व्हावं सुशिक्षित होऊन सन्मानाने जीवन जगावं आणि सन्मानाने जीवन जगत असतानाच आपण चांगलं व्यक्तिमत्व व्हावं आम्ही आपण सर्वांना नेहमीच मदत करीत राहू शैक्षणिक क्षेत्रात कुठलीही अडचण असू द्या किंवा आली तरी आम्ही त्याला नक्कीच मदत करू असे आश्वासन दिले आपण सर्वांनी आमच्या पारधी वस्ती वर येऊन आमच्या आदिवासी फासेपारधी समुदायातील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला व वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या फासेपारधी समुदायाला शैक्षणिक शालेय साहित्याची मदत दिली आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय संस्था ही तळागाळातील दुर्बल वंचित घटकांसोबत सातत्याने काम करत आहे शैक्षणिक सामाजिक पारधी समुदाय शिक्षणाच्या प्रभात यावा आदिवासी फासेपारधी समुदायाने शैक्षणिकरित्या सक्षम व्हावं याकरिता आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय संस्था समुदायसोबत सातत्याने कार्यरत आहे आपण दिलेल्या मदतीबद्दल पारधी समुदायाला एक मदत मिळाली व शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखीन त्यांच मनोबल घट्ट झालं असं म्हणत आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अचिन पवार यांनी आपलं मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित आम्रपाल कांबळे सर व सहपरिवार विशेष कार्यकारी अधिकारी राजू थूल सर, स्नेहल कांबळे,सुभाष गायकवाड, बंडुजी नाखले, डॉ दिक्षा थुल, सारिका व प्रशांत आकोटकर आदर्श हाडके आकाश पवार अजित पवार अमित पवार अमिता पवार छकुली मनीषा पवार संदीप भोसले कानेशा काळे व आगरगाव पारधी वस्ती येथील नागरिक उपस्थित होते


0 टिप्पण्या