Ticker

6/recent/ticker-posts

कोसरसार पुलाच्या पुरातुन जीवघेना प्रवासादरम्यान दुर्दैवाने बाळ पोटातच मृत्युमुखी.


वरोरा तालुक्यातील कोसरसार येथील घटना


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावति : आज वरोरा तालुक्यातील बोडखा ते कोसरसार पुलावर पुराचा पाणीप्रवाह वाढल्यामुळे रुग्णवाहिका येऊ शकली नसल्यामुळे प्रसुती रुग्णाला ग्रामस्थांनाच्या मदतीने पुरामधुन जीव घेना प्रवास करावा लागला दुर्दैवाने या प्रवासा दरम्यान बाळ पोटातच मृत्युमुखी पडले. याच पुलावरून एक आई आपल्या बाळाची प्रकृती ठिक नसल्यामुळे  पाण्याने भरलेल्या पुलावरून जात असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

हा प्रकार केवळ बोडखा गावकऱ्यांसाठी नाही तर संपुर्ण समाजासाठी शरमेचीबाब आहे. आजच्या आधुनिक युगात मुलभुत रस्ता व आरोग्य सुविधांच्चा अभावामुळे असे जीव गमवावे लागते. हि अतिशय गंभीर बाब आहे.प्रशासनाने याकडे गाभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

काही दिवसापूर्वी शालेय विद्यार्थी सुद्धा कंबर भर पाणी असताना पुलावरून जाण्यासाठी मार्ग शोधत होते. दरवर्षीचा हा त्रास बोडखा मोकाशी या गावातील जनतेला त्रास सहन करावा लागतो पण संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग यांच्या अधिकारी यांनी कधी सर्वे सुद्धा  केला नाही किंवा आजपर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधी या चंद्रपूर जिल्हाच्या सीमेवर असलेल्या शेवटच्या गावावर कधी लक्ष सुद्धा दिले नाही. हिच परिस्थिती कायम राहणार असेल फक्त निवेदन देत बसायचं काय.? मीडिया वर बातम्या गाजतात तरी पण प्रशासनाला कधी जाग येत नाही. नविन पूल द्यावा असं कोणत्याच लोक प्रतिनिधीला आजपर्यंत कधी वाटले नाही गावाकऱ्याची एकच अपेक्षा ठरली आहे हा  पाण्याने भरलेला पूल कुणाचा जीव घेणार नाही तो पर्यंत सुस्त प्रशासनाला जाग येणार नाही. काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या