Ticker

6/recent/ticker-posts

खळबजनक : वरोरा येथे धारदार शस्त्राने वार करुन एकची हत्या.


एक जन पोलिसांच्या जाळ्यात, दुसरा आरोपी फरार,



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : वरोरा शहरात गणपती विसर्जन मिरवणूक करताना दोघांत वाद झाल्यावर मृतक साई मंगल कार्यलया जवळ आला असता आरोपी त्याचे मागे येऊन चाकुने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. अवस्थेत रुग्णालयात दाखल करताच त्यांचा  मृत्यू झाला.

या घटनेमुळे  शहरातील नागरिकांच्या हृदयाचे ठोकेच उडिले. अगदी शुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असणाऱ्या अमोल नवघरे वय 35 वर्ष राहणार जिजामाता वार्ड वरोरा यांनी अंदाजें 7.00 वाजताच्या सुमारास साई मंगल कार्यालया जवळ अमोल नवघरे नावाच्या व्यक्तीने मृतक नितीन  चुटे याला चाकूने सपासप वार करून जागीच ठार केल्याची माहिती रात्री 7:30 वाजताच्या सुमारास समोर आली,

या घटनेची माहिती शहरात सर्वत्र पसरताच शहरातील नागरिक साई मंगल कार्यालयाच्या दिशेने घटना स्थळी पोहचले, मात्र पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृत झालेल्या नितीन चुटे याला उपजिल्हा रुग्णालयात पोहचवून आरोपी अमोल नवघरे याला अटक केली आहे, या घटनेने अख्ख शहर हादरलं असून वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे, दरम्यान आरोपी सोबत पुन्हा एक साथीदार असल्याची चर्चा आहे, त्यातच त्याचा भाऊ असल्याची पण माहिती समोर येत आहे, मात्र तो फरार होण्यास यशस्वी झाला आहे, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीसाची एक तुकडी रवाना झाल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल यांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये भेट देऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेऊन आवश्यक सूचना पोलिसांना केल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या