पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल.
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड
नांदेड :-दुधड येथे एका महिलेची निर्घृणपणे अज्ञाताकडून हत्या करून घरातील सामानांची नासधुस करुन पसार झाल्याची घटना दिं ९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे..
हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील अन्नपूर्णाबाई कोंडबा शिंदे वय अंदाजे ४५ असलेली महिलेची निर्घृणपणे अज्ञाताकडून मध्यरात्री हत्या करून घरातील सामानांची नासधुस केल्याची धक्कादायक घटना दिं ९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असता गावकऱ्यांनी तात्काळ हिमायतनगर पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने पोलिस निरीक्षक अमोल भगत बिट जमादार शंकर नलबे सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करून हत्येप्रकरणी तपास सुरू करुन उपविभागीय अधिकारी हाक्के यांना माहिती दिली असता भोकर येथील उपविभागीय अधिकारी हाक्के व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले होते मात्र हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले जात आहे अन्नपूर्णाबाई कोंडबा शिंदे यांची हत्या करणारे अज्ञात चोरांनी केला असेल की कोणी हत्या करण्याच्या उद्देशाने येवून हत्या करून पोबारा झाले असतील असे अनेक प्रश्न घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमधून उपस्थित होत आहेत..
तरी पोलिस प्रशासनाने सदर घटनेचा तपास तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.


0 टिप्पण्या