Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी विद्यालय, हंडरगुळी येथील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेसाठी निवड.........


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-दि. ०९ सप्टेंबर २०२५  रोजी  उदयगिरी महाविद्यालय,उदगीर येथे तालुकास्तरीय धावणे स्पर्धा  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर द्वारा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी ता. उदगीर  विद्यार्थ्याने तालूकास्तरीय वयक्तिक धावणे  स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे व त्यांची निवड जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. जाधव पूनम श्याम हीने या वयक्तीक धावणे  ४०० मी व१५०० मी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले आहे. तसेच (४oox ४ )  मीटर  रिले धावणे स्पर्धेत जाधव साधना, उडते प्रिया, श्रीमंगले दिव्या, शाहीर शितल, जाधव पूनम  धावणे स्पर्धेत या सर्वांनी प्रथम क्रमांक पटकावला आहेत तसेच धुमाळ श्रेया, राठोड स्वप्ना हिने धावणे स्पर्धेत  तृतीय क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक जाधव रविप्रकाश  यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर  संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याधापक सय्यद रफिक, पर्यवेक्षक (स्काऊट मास्टर ) सुगावे बालाजी, नाटकरे बी.एस,मैलारे एम.टी, कणसे व्ही.एस, बगाडे तुकाराम,घटकार रामचंद्र, पाटील आर. एम, गायकवाड संजय, भीमकिरण गायकवाड,गुडाप्पे आर. एस, वेभव कासले,सुर्यवंशी विनीत,मळभागे शिवानंद, भोसले अरविंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या