चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-योगवृत्ती ,प्रमुख योगशिक्षक श्री श्याम कुकडे भंडारा यांनी जिल्ह्यातील हजारो लोकांना योगासन व प्राणायामाचे घडे दिले .योगगुरु श्री रामदेव बाबा प्रणित योग प्रसाराची सुरुवात भंडारा जिल्ह्यात करणारे योग तज्ञ श्री शाम कुकडे आपल्या यशस्वी जीवनाची 82 वर्षे पूर्ण करीत आहेत. श्री श्याम मार्कंडराव कुकडे जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी योग प्रसार करण्याचे व्रत स्वीकारले.1990 पासून डॉ यशवंत गायधनी यांचे माध्यमातून योगाभ्यासी मंडळाशी त्यांचा संपर्क होताच जनार्दन स्वामीकृत योगासने यांचा अभ्यास ते करीत होते. .2005 मध्ये योग गुरु रामदेव बाबा यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्या योगप्रसाराला वेग आला. भंडारा जिल्ह्यात सर्वप्रथम पतंजली योग समिती स्थापन करण्याच्या मान योग तज्ञ श्री शाम कुकडे यांना आहे .रामदेव बाबांनी सांगितलेल्या योगोपचार सर्व समाजाला अवगत करून देण्यासाठी त्यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अनेक (200 च्यावर)योग शिबिरे घेतले. "करो योग रहो निरोग"असा नारा देत हजारोंना योगाभ्यास शिकविला .
भंडारा येथील मिस्कीन टॅंक गार्डनच्या हिरवळीवर नियमितपणे पहाटे 5 वाजेपासून त्यांनी योगसाधकांना योगाचे धडे देणे सुरू केले.3_45 वा. उठणे,सर्व विधी आटोपून 4.30 ला पायदळ घरून निघणे व 5.00 वा. गुरुब्रम्हच्या नादात ते योग विद्याचे वर्ग,शिबिर निनादू ते धनी ठरले.योगामुळे अनेकांचे दुर्धर आजार त्यांनी संपवीले आहे. मध्यंतरी यांना पक्षाघाताचा झटका येऊन गेला ,केवळ योग विद्येच्या सहाय्याने त्यांनी पक्षाघातवर ही मात केली आणि पुन्हा आयुष्याच्या नव्याने जगण्याची सुरुवात केली. स्वतःच्या आयुष्यातील योगाच्या चमत्कार त्यांनी इतरांनाही सांगितला,अनेकांनी पाहिला. आज रामदेव बाबा प्रणित योग प्रचार आणि प्रसार यासाठी त्यांनी आपले मोठे आयुष्य वाहून घेतले आहे. श्याम कुकडे यांचा जन्म गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील केसलवाडा या गावी 26 सप्टेंबर 1943 ला झाला. वडील शेतकरी, प्राथमिक शिक्षण सहगावी,माध्य. शिक्षण मुंडीकोटा येथे सुभाष विद्यालय ला झाले. केसलवाडा ते मुंडी कोटा दररोज 18 की.मी. अंतर ते रोज पायी धुळ्यावरून चालत पूर्ण करीत होते. तेव्हा रस्ते व सायकल नव्हती, पांडुरंग गौतम (नवेगाव) व अभिनव शंकर शेंडे (सेलोटपार )हे त्यांचे बालपणाचे मित्र होते .आठवी नंतर पुढील शिक्षणाकरिता ते नागपूरला गेले. 1958 ते 1961 काळात मॅट्रिक पूर्ण करेपर्यंत काही जिवलग मित्र डॉ. सुधीर मेश्राम ,हर्षवर्धन गजभिये( आयएएस), प्रेम साखरे,प्रविर चक्रवर्ती (रिटा डीआयजी) विजय माथनकर (आयएएस )हे त्यांचे सोबतीला होते. नागपूर च्याजीएस कॉमर्स कॉलेजमधून बी कॉम व एम कॉम केले व संख्याशास्त्र मध्ये प्रावीण्य मिळविले. कॉलेजमधील मित्रांमध्ये नंदकिशोर गट्टानी, बाळासाहेब मुखरे, (पुसद) ओमप्रकाश माहेश्वरी (पिपलानारायण) प्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण (विजय पाटील) यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
1968 साली त्यांची नेमणूक गोंदिया जिल्हा परिषदेत सांखिकिय विस्तार अधीकारी पदावर झाली. तिरोडा ,मोहाडी, अर्जुनी मोरगाव, साकोली, भंडारा या पंचायत समिती मधून प्रवास करीत प्रभारी बीडीओ या पदावरून ते २००१ साली सन्मानाने निवृत्त झाले. भ्रष्टाचार ,व्यभिचार इत्यादी पासून ते सदैव दूर राहिले.सहचारिणी सौ .कमलाताई यांनी त्यांना मनापासून साथ दिली.21 सप्टेंबर 2005 मध्ये परमपूज्य रामदेव बाबा यांनी त्यांची निवड योग शिबिर प्रशिक्षणासाठी केली.
दर दिवशी पहाटेला न चुकता ते आपल्या योग वर्गाला सुरुवात करतात.या मध्ये 75,80 वर्ष व वरील असलेल्या योगसाधकांचे सत्कार,योगसध्कांचे जन्मदिन,राष्ट्रीय सण, गुरुपौर्णिमा ई उपक्रम शांततेत साजरे करण्यात येतात.मोठ्या संख्येने योग साधक_साधिका ना योग शिबिरातून लाभ झाला आहे.त्यांच्या सोबतीला महादेव बांगडकर, चींधुजी बुद्धे, पुरुषोत्तम साकूरे,अतुल वर्मा,संजय मोहतूरे ई अनेक सहकारी मंडळी असते . भंडारा येथे एक चांगले योगें केंद्र स्थापन करण्याचा त्यांचा मानस होता.त्यांच्या इच्छेनुसार आमदार मा.श्री नरेंद्र भोंडेकर यांचे प्रयत्नातून संभाजी राजे योग उद्यान येथे नवीन वास्तू साकार होत आहेत.काम सुरू असून सध्या त्यांचे योग वर्ग शिवारपण टॉवर येथे सुरू आहे. या वयात ही त्यांची राहणीमान,सक्रियता वाखाणण्याजोगे आहे. जो पर्यंत शरीर कायम आहे,तो पर्यंत माझे योगसाधका करिता योगवर्ग सुरू राहील असे शाम कुकडे यांचे म्हणणे आहे.त्यांच्या या वाट चालीला व प्रवाशाला खूप_खूप शुभेच्छा.
*मो सईद शेख*भंडारा*


0 टिप्पण्या