Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपुरात 16 तारखेला जनता दरबार! ना.रामदास आठवलेंची उपस्थिती!

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त  दीक्षाभूमीवर दोन दिवशीय कार्यक्रमांचे आयोजन ! 

चित्रा न्युज प्रतिनिधी 

चंद्रपूर : जिल्ह्यात येत्या 16 तारखेला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आगमन होत आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने स्थानिक दीक्षाभूमीवर 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त भिमगितांचा व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन ना.रामदास आठवले यांचे हस्ते होणार आहे.
या आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री तथा बल्हारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार व राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी दिली.
ना.आठवले यांचे जंगी स्वागत रिपाइं आठवले गटाचे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष सुमित कुमार चंद्रागडे यांचे नेतृत्वात शहरातील अनेक भंतेजी शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेश व्दारावर करणार असल्याचे तोडे यांनी सांगितले.
दरम्यान सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्या आगमना प्रित्यर्थ शहरातील मुख्य मार्गावरील हाँटेल कुंदन प्लाझा ते रेस्ट हाॅऊस पर्यंत रिपाइं जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष प्रविण देठेकर यांच्या नेतृत्वात एक भव्य बाॅईक रॅली काढण्यात येणार आहे.
दुपारी 2 वाजता स्थानिक विश्रामगृहात ना.रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबार होत असून जनतेच्या तक्रारी व समस्यांचे निवेदने रिपाइंचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे व जिल्हा महानगर शहर अध्यक्ष राजू भगत हे स्विकारणार आहेत.
काल शनिवारी रिपाइंचे विदर्भ प्रदेश महासरचिटणीस अशोक घोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील वसंत भवन येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अनेक जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक दीक्षाभूमीवर होणा-या दि.15 व 16 तारखेच्या दोन दिवशीय कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे व रिपाइं कोरपना अध्यक्ष प्रभाकर खाडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या