चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-" ग्राम से संबृध राष्ट्र निर्माण और समाज सेवा ही ईश्वर सेवा,, या तत्वावर ग्राम गोपीवाडा येथे गावातील आणि परिसरातील जनतेकरिता सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, यात पर्यावरण व नैसर्गिक शेती या बद्दल जनजागृती, करण्याकरिता कला पथकांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली तर 8, दिवसीय ब्युटी पार्लर कोर्स चे महिलांकरिता आयोजन, एवढेच नाही तर जनसामान्यान करिता मेगा मेडिकल कॅम्पस ज्यात सिकंसेल, मधुमेह, क्षयरोग, डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मे वाटप, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षेचे बुक्स वाटप ,,असे.विविध उपक्रम या सेवा सप्ताहात राबविण्यात आले या मोहिमेची सुरवात दिनांक 3 ऑक्टोबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली त्यात सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या नारी शक्ती व सफाई कर्मचाऱ्यांचे सत्कार सुद्धा करण्यात आले , हे सर्व उपक्रम कमांडो ग्रुप चे संस्थापक, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर डोळस यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वात करण्यात आले , या उपक्रमास यशस्वी बनवण्याकरिता कमांडो ग्रुप, ग्रामपंचायत कार्यालय, लायन्स क्लब भंडारा, मुख्य मदतीने आणि ग्रामपंचायत कार्यालय, लायन्स क्लब भंडारा, मुख्य मदतीने आणि सहकार्याने राबविण्यात आले.कमांडो ग्रुप चे संस्थापक चंद्रशेखर डोळस ,सरपंच विनायक टांगले,लायन्स क्लब भंडारा चे अध्यक्ष हिना गज्जर,शहापूर येथील मेडिकल ऑफिसर झोडे, प. स.सदस्य संजय बोंद्रे,सुरेंद्र कुलरकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सेवा सप्ताह कार्यक्रम संपन्न झाले.


0 टिप्पण्या