सालाचे 12 महिने दर्शनासाठी गर्दी
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:- ता.उदगीर येथील स्व.शेख बाबुलाल यांनी २००९ मध्ये स्वखर्च करुन महाकाली देवीचे मंदीर बांधले आणि पंचक्रोशित हिंन्दु-मुस्लिम बंधू प्रेम व एकता हा संदेश दिला.
हंडरगुळी येथील महाकाली देवीचे नि:स्सीम भक्त म्हणुन पंचक्रोषित स्व.बाबूलाल शेख (महाराज) यांची ओळख होती.ते हयात असे पर्यंत ते स्व:ता व घरातील इतर सदस्य देवीचे पुजा,पाठ करायचे.बाबूलाल शेख यांच्या अकाली निधनानंतर मंदीराची देखभाल व देवीची पुजा,आराधना त्यांचे कुटूंबिय करु लागले.आणि दर वर्षी नवराञी पुर्वी मंदीराची सजावट रंगरांगोटी स्वखर्चातून बाबूलाल शेख यांचे सुपूञ तथा महाकाली मंदीराचे पुजारी,सेवेकरी शेख निगम महाराज व शेख ईलाही महाराज हे करतात.
स्व.बाबुलाल शेख हे मुस्लिम असून ही समाज काय म्हणेल?याचा कांही विचार न करता केवळ महाकाली देवीवरील श्रध्देपोटी व प्रेमापोटी स्व खर्चातून स्वजागेवर महाकालीचे अत्यंत देखणे मंदीर उभारले.आणि हजारो हिंन्दू-मुस्लीम भाविकांच्या उपस्थितीत मंदीरात महाकालीची प्राणप्रतिष्ठापणा केली.
या मंदीरात मराठवाड्यातील तसेच कर्नाटकातील अनेक गावातील भक्त सालाचे १२ ही महिणे दर्शनासाठी येतात.नवराञी मध्ये हाळी,सुकणी, आनंदवाडी,मोरतळवाडी,रुद्रवाडी, खरबवाडी,चिमाचीवाडी,टाकळगाव, वडगाव,शेळगाव,वायगाव या आस पासच्या गावातील हजारो महिला भक्त दर्शनासाठी व बोललेले नवस फेडण्यासाठी येतात.नवराञी मध्ये दत्ता घोगरे,उध्दव घोगरे,विजय राजे, शेख निगम महाराज,शेख ईलाही महाराज यांच्यासह शेख कुटूंबिय व हिंन्दु महिला,पुरुष भक्त महाकालीचे मनोमन पुजन करतात.तसेच सबंध नवराञात रोज या मंदीरात आराधी, आरती व अन्य धार्मिक कार्यक्रम होत असतात.


0 टिप्पण्या