विजय चौडेकर चित्रा न्यूज जिल्हा प्रतिनिधी
नांदेड -शेतकरी व दिव्यांग बंधु व भगिनीं यांच्या तसेच मोलमजुरी करणारे,मेंढरपाळ,शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी म्हणुन दिव्यांगांचे कैवारी मा.मंत्री मा.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या आंदोलनास मी पाठिंबा म्हणुन येत्या काही दिवसात अमरण उपोषणास बसण्या करिता मा.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच ज्या विभागाशी निगडीत असलेल्या प्रश्ना बाबत निवेदन दिलेली आहेत आणि हे निवेदन गेल्या वर्षी पासुन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता.
पण माझ्या निवेदनात जे जे मागण्या केलेल्या आहेत ती पुर्ण केल्या नाहीत अथवा त्याचा विचार देखील झालेला नाही म्हणून मी माझ्या मागण्या किंवा बच्चू भाऊ नी मागितलेल्या मागण्या सारखेच व मिळते जुळते असल्यामुळे मी बच्चू भाऊंच्या आंदोलनास पाठिंबा म्हणुन भारतीय लहुजी सेना संघटनेचा पाठिंबा व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना च्या उपोषणास वतीने आमरण उपोषणास बसणार आहे,


0 टिप्पण्या