चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-हंडरगुळी येथील मुख्य बाजारपेठेत आ.संजय बनसोडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सिमेंट रोडचे काम सुरु झाल्याने व्यापारी व गावकरी समाधान व्यक्त करत आहेत.
हंडरगुळी येथील मुख्य बाजारपेठेत २० वर्षापुर्वी ग्रा.पं.मधील तत्कालीन सत्ताधा-यानी कर्ज काढूण सिमेंट रोड बनवला होता.त्या रोडची मोठी दुरवस्था झाली होती.तसेच पावसाचे पाणी पडताच खड्डे व रोड चिखलात व पाण्यात बुडालेला असायचा.अन् याचा ञास वाहनधारकांसह ग्राहक व ग्रामस्थ,व्यापारी यांना व्हायचा.या सर्व बाबीची दखल ग्रा.पं.मधील ग्रामपंचायत अधिकारी एस.आर. कांबळे,सरपंच विजय अंबेकर आणि उपसरपंच बालाजी भोसले-पाटील या ञिमूर्तीने घेतली.आणि दि.१५ रोजी छञपती शिवाजी महाराज पुतळा ते सरकारी दवाखाना गेट पर्यंत या रोडच्या दहा लक्ष रुपये खर्चाच्या कामाला प्रारंभ केला. यामूळे ग्रामस्थं,वाहनधारक व ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे
———————————————
गावात विविध कामे जे की सामान्य जनतेच्या लक्षात असतील.अशी विकास कामे केलो असून या रोडसाठी आमदार फंडाचे १० लक्ष मंजूर होऊन काम दर्जेदार करवुन घेत आहे.अशी माहिती सरपंच विजय अंबेकर यांनी दिली.
———————————————
ग्रा.पं.च्या माध्यमातून समाजकारण व विकासाचे राजकारण करण्याकडे मी प्राधान्य देत असून गत साडेचार वर्षात पाचही वार्डात "बीएसपी" म्हणजे "बिजली,सडक,पाणी" या सुविधांसह पायाभुत सुविधा निर्माण केलो आहे.आ.संजय बनसोडेंच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा विविध खात्याचा निधी आणुन गावातील कोपरा न् कोपरा विकास कामाने रंगवून टाकणार आणि हंडरगुळी नगरी सुजलाम् सुफलाम् बिनविणार अशी माहिती उपसरपंच बालाजी भोसले-पाटील यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या