चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील प्रा.आ.केंद्रात क्षयरोग निदान शिबीर दि.९ रोजी संपन्न झाले.
हाळी,मोरतळवाडी,सुकणी,रुद्रवाडी आनंदवाडी,खरबवाडी,चिमाचीवाडी या आसपासच्या गावातील महिला- पुरुष नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.अधूनिक तंञज्ञानाच्या {मशीन} च्या साह्याने रुग्णांची योग्य प्रकारे निदान (तपासणी) करण्यात आले.
यावेळी संजय गिराम (क्षय किरण वैज्ञानिक),डी.आर.सुर्यवंशी (को- आर्डिनेटर,लातूर)साठे (क्षय किरण तंञज्ञ,पुणे),वै.अ.एस.एस.काळवणे,डाॅ.मारिया तांबोळी,सचीन पंडीत व अन्य अधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या