Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीच्या बीजेपीत एकही लायक नाही का?जिल्हा कार्यकारिणीत डावलल्याने चर्चांना उधान..!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-नुकतीच बीजेपीची लातुर जिल्हा कार्यकारिणी श्रेष्ठींनी घोषीत केली. त्यात येथून जवळ व छोटेसे गाव असलेल्या वडगाव (ए) या गावातील व्यक्तीला घेतले.पण लातूर जिल्ह्यात म्हत्वाचे व मोठे गाव असलेल्या उदगीर तालुक्यातील हाळी व हंडरगुळी या २ ही गावातून १ पण कार्यकर्ता जिल्हा कार्यकारिणी मध्ये घेतला नाही.कांही महिण्यापुर्वी घोषीत केलेल्या उदगीर तालुकाच्या कार्यकारिणीतही येथून एकालाही घेतले नाही.म्हणून हाळी-हंडरगुळी च्या बेजीपी मध्ये एकही लायक व्यक्ती नाही का ? तसेच येथे जे कुणी भाजपवाले आहेत.ते फक्त डिजीटल हिरो आणि पक्ष कार्यात झिरो आहेत.अशा चर्चांना परिसरात ऊत आले आहे.
याची थोडक्यात माहिती अशी की, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर यांनी दि.८ रोजी सायंकाळी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.त्या मध्ये जिल्ह्यातील छोट्यातल्या छोट्या गावातील युवा व फादर बाॅडीतल्या कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या बाॅडीवर घेऊन सन्मान केला.पण जिल्ह्यात म्हत्वाचे गाव व तालुक्याचे राजकारण फिरवायची क्षमता असलेल्या हाळी व हंडरगुळी या २ गावातील कार्यकर्त्यांपैकी १ ही कार्यकर्ता उपाध्यक्ष,सचीव अशा पदावर तर सोडा पण साधा सदस्य म्हणुन ही घेतला नाही.यामूळे येथील भाजपाचे कार्यकर्त्यांची लायकीच !पक्षाने त्यांना दाखवून दिली आहे. असे पक्षाच्या मतदारात बोलले जाते. १९९७ ला १ जि.प.व १ पं.स.सदस्य ज्या गावातून निवडून आले होते.त्या गावात आजवर कधी पक्षाचा अजेंडा राबवल्याचे दिसले नाही.किंवा स्व. अटलजी वाजपेयी,प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सारख्या स्वर्गीय लोकनेत्यांचे कधी स्मरण (पुण्यतिथी जयंती) केल्याचे आठवत नाही. तसेच जनहितासाठी म्हणजे येथील गुराच्या बाजाराला गतवैभव मिळावे म्हणुन तसेच दवाखान्यात परमानंट डाॅक्टर मिळावे म्हणुन आणि लातूर करिता जादा बसेस सोडाव्या म्हणुन हाळी-हंडरगुळीतील भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याने,पुढा-याने कष्ट घेतल्याचे किंवा जनांदोलन केल्याचे पक्षाच्याश्रेष्ठींसह कुणालाही आठवत नाही.आणि या सर्वांचा परिणाम म्हणुन जिल्हा कार्यकारिणीत श्रेष्ठींने डावलले.असा सुर कानावर पडतोय.
चामे व लोणाळे यांचे होतेय अभिनंदन
जिल्हा कार्यकारिणीत अहमदपुरचे अॅड. भारत चामे (उपाध्यक्ष) वडगाव एक्कीचे सज्जण लोनाळे (चिटणीस) यांना मानाचे पान दिल्याने चामे व लोणाळे यांचे जेष्ठ पञकार विठ्ठल पाटील,डाॅ.राज पाटील कुमठेकर,किरण गुरमे आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या