श्रीकांत बाराहाते जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण हिंगोली
हिंगोली- अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या हिंगोली जिल्हाच्या औंढा नागनाथ तालुकास्तरीय अध्यक्षपदी सिद्धनाथ पुंडगे यांची नियुक्ती करण्यात आली. तर यांची सामाजिक प्रश्नांवरील सक्रियता, समर्पित कार्य आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास लक्षात घेऊन त्यांची औंढा नागनाथ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रदेश अध्यक्ष ऍडवोकेट आत्माराम दवणे यांनी अखिल भारतीय राहूल गांधी ब्रिगेड काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संघटक महासचिव तथा ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष जया रिजवानी, प्रदेश उपाध्यक्ष ॲडवोकेट मारोती अनिल सोनुले, जिल्हा अध्यक्ष माननीय ऍडओकेट गौतम श्रीखंडे, ऍडओकेट मेहराज, जिल्हा सचिव नितीन राठोड, सागर इंगोले, दिपक काशिदे, उतम गायकवाड, वसमत तालुका अध्यक्ष अशोक इंगोले यांच्या मार्गदर्शना खाली ही निवड करण्यात आली. तर या वेळी त्यांना औंढा नागनाथ शासकीय विश्रामगृहात प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देत, त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरावर त्यांचे स्वागत होत असताना दिसत आहे.


0 टिप्पण्या