चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : मूल तालुक्यातील जानाळा येथील भक्तगणांचे श्रध्दास्थान ठरलेल्या भूतेश्वर महादेव मंदिर नासधूस प्रकरणी गैर अर्जदारांविरुध्द न्यायालयात जाणार असल्याचे जानाळा येथील मुळ रहिवाशी असलेल्या व सध्या उपराजधानी नागपूरात वास्तव्य करणाऱ्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
जानाळा येथे आपली शेतजमीन होती .ती जमीन काही कारणास्तव भंडारा येथे राहणारे तिरुपती क्रिष्टया कनकटी व श्रीलता कनकटी यांना काही दिवसांपूर्वी विक्री करून दिली.
दरम्यान विक्री पत्र तयार करून घेत असताना एका शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती सदरहु शेतजमीनी मधील मंदिर व काही जागा माझ्या कब्जात राहिल असा करार नामा जमीन विक्री करून घेणा-या कडून मायाताई कोसरे यांनी लिहुण घेतला होता.
त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समजते.या नंतर ही गैरअर्जदारांने आपल्या अनुपस्थितीत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भूतेश्वर महादेव मंदिराची नासधूस केल्याची तक्रार त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मूल पोलिस स्टेशनला केली होती.याच तक्रारीच्या अनुषंगाने मूलचे उपाविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी मायाताई कोसरे व समाजसेवक दत्तात्रय समर्थ यांना नोटीस देवून दि.३-१०-२०२५ला उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याची सुचना केली होती.ते दोघेही सुचनेचे पालन करीत उपरोक्त तारखेवर न चुकता हजर झाले.मूलचे समाजसेवक
दत्तात्रय समर्थ यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून योग्य न्याय मिळावा यासाठी समाजसेविका मायाताई कोसरे यांनी न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे.त्यांनी या बाबतीत चंद्रपूर व नागपूर येथील नामवंत वकिलांचा सल्ला देखील घेतला आहे.
या प्रकरणात संबंधित पटवारी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का चौकशी करून रितसर अहवाल मूलच्या तहसिलदार मृदूला मोरे यांच्या कडे पाठवला असल्याचे समजते.
आजपर्यंत त्या गट नंबरच्या सातबाराच्या इत्तर अधिकार काॅलम मध्ये भूतेश्वर महादेव मंदिराची नोंद येणे आवश्यक असताना ती नोंद कुठल्याही कार्यरत पटवा-यांनी आज पर्यंत घेतली नाही.हे येथे उल्लेखनीय आहे.


0 टिप्पण्या