Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम मुंडीपार येथे भजन–किर्तन, पूजा-अर्चनेतून क्षत्रिय पोवार समाजाचा कोजागिरी उत्सव साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 मुंडीपार:क्षत्रिय पोवार समाज संघटना, मुंडीपार यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने कोजागिरी मिलन सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
         संघटनेची स्थापना सन २०१८ मध्ये करण्यात आली असून स्थापनेपासूनच या संघटनेतर्फे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या परंपरेचा पुढील भाग म्हणून यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशेष भजन–किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
   कार्यक्रमाची सुरुवात माता गड़कालिकेच्या पूजन-अर्चनेने करण्यात आली. त्यानंतर चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी क्षत्रिय पोवार समाज संघटनेचे सर्व सभासद, ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  भजन–किर्तनाच्या माधुर्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थितांनी रामनामाचा रसास्वाद घेत अध्यात्मिक आनंद लुटला.
   कार्यक्रमाच्या शेवटी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम भक्तीभावाने, शांततेत आणि उत्साहात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या